Karan Johar And Kangana Ranaut: करण जोहर कंगनाच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबाबत काय म्हणाला? जाणून घ्या
Karan Johar And Kangana Ranaut: कंगनाच्या चित्रपटाबाबत काय म्हणाला करण? याबाबत जाणून घेऊयात...
Karan Johar And Kangana Ranaut: चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) यांच्यामध्ये सोशल मीडियावर सुरु असणारं शब्दिक युद्ध अनेकांना माहित असेल. कंगना अनेकवेळा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणवर टीका करत असते. पण या दोघामधील वाद संपणार आहे, असा अंदाज सध्या करणच्या एका वक्तव्यानंतर नेटकरी लावत आहेत. कंगनाच्या चित्रपटाबाबत काय म्हणाला करण? याबाबत जाणून घेऊयात...
एका मुलाखमध्ये करणनं कंगनाचा इमर्जन्सी चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुलाखतीमध्ये करणने कंगनाच्या इमर्जन्सीचा उल्लेख केला. करण जोहर म्हणाला,'इमर्जन्सी चित्रपट रिलीज होत आहे आणि तो पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' करण जोहर हा सहा वर्षांनंतर कंगनाबद्दल बोलला आहे .
कंगनाने 'कॉफी विथ करण' शोमध्ये करणला मूव्ही माफिया म्हटले होते. तेव्हापासून कंगना सोशल मीडियाच्या माध्यमातून करणवर टीका करते. आता करण जोहरनं इमर्जन्सी हा चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर यावर कंगना काय प्रतिक्रिया देणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन करणला 'रिटायर हो!' असा सल्ला दिला. कंगनानं पोस्टमध्ये लिहिलं होतं, “भारतीय प्रेक्षक न्युक्लिअर वेपन आणि अणुविज्ञानावर आधारित असणारा 3 तासांचा चित्रपट पाहत आहेत. आणि ही नेपो गँग त्यांचा 'सास बहू का रोना' दाखवत आहेत, एक डेली सोप बनवण्यासाठी 250 कोटी का लागतात? सारखे तसेच चित्रपट बनवणाऱ्या करण जोहरला लाज वाटली पाहिजे. हा स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा ध्वजवाहक म्हणवून घेतो आणि सतत मागे पडत राहतो. एवढे पैसे वाया घालवू नको, आता तू रिटायर हो आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना नवीन आणि क्रांतिकारी चित्रपट बनवू देत.'
करण जोहरने सात वर्षानंतर दिग्दर्शनात पुनरागमन केले. त्याच्या रॉकी आणि रानी की प्रेम कहानी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
कंगनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. कंगना (Kangana Ranaut) ही चंद्रमुखी 2 या चित्रपटाबरोबरच इमर्जन्सी आणि तेजस या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगनाचा 'टिकू वेड्स शेरू' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut: 'तू रिटायर हो!' म्हणत कंगनानं करण जोहरवर साधला निशाणा, रणवीर सिंहला दिला 'हा' सल्ला