Jagjit Singh Death Anniversary : 'जहाँ तुम चले गए..' गझल सम्राट जगजित सिंह यांची पुण्यतिथी
कोई फरियाद, चिट्ठी ना कोई संदेश या गलझ जाणू लोकांना तोंडपाठ झाल्या आहेत.
Jagjit Singh Death Anniversary: गझल सम्राट जगजित सिंह (Jagjit Singh) यांची आज पुण्यतिथी. त्यांनी आपल्या आवाजानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. 10 ऑक्टोबर 2011 रोजी जगजित सिंह यांचं निधन झालं. घराघरात गझल पोहोचवणाऱ्या जगजित सिंह यांच्या गझल लोक आजही आवडीनं ऐकतात. कोई फरियाद, चिट्ठी ना कोई संदेश, होठोंसे छुलो तुम या आणि अशा अनेक गलझ जणू लोकांना तोंडपाठ झाल्या आहेत. बॉलिवूडमधील संगीत क्षेत्रातील अनेक पुरस्कारांनी जगजित सिंह यांना गौरवण्यात आलं होतं. 2003 साली त्यांना भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जगजित सिंह यांना गझलच्या दुनियेचा बादशाह असं म्हणण्यात यायचं.
गझल सम्राट जगजित सिंह (Jagjit Singh) यांनी जाहिरातींमधील गाण्याने आपल्या गायणाच्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते प्लेबॅकसिंगर झाले. अनेक चित्रपटांमधील गाणी देखील त्यांनी गायली.
जब सामने तुम आ जाते हो
जगजीत सिंह (Jagjit Singh) यांच्या जब सामने तुम आ जाते हो या गझलला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. जगजीत सिंह यांच्यासोबतच लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी देखील ही गझल गायली गायली आहे. या दिग्गज गायकांच्या आवाजामधील ही गझल 2008 मध्ये प्रदर्शित झाली.
होशवालों को खबर क्या
ही गझल तरुणांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच आवडते. 1999 मध्ये रिलीज झालेला आमिर खानच्या सरफरोश चित्रपटातील ही गझल लोक आजही आवडीनं ऐकतात.
चिट्ठी ना कोई संदेश
'दुश्मन' चित्रपटातील त्यांची चिठ्ठीनं चिट्ठी ना कोई संदेश ही गझल देखील लोकप्रिय ठरली. 1972 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता.
कोई फरियाद
2001 साली 'तुम बिन' या चित्रपटातील कोई फरियाद ही गझल जगजित सिंह यांनी गायली होती. संगीत प्रेमी ही गझल आजही ऐकतात. 'कोई फरियाद तेरे दिल में दबी हो जैसे..तूने आंखों से कोई बात कही हो जैसे' अशा ओळी या गझलमध्ये आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:
Jagjit Singh : 'गालिब'ला घराघरा पोहोचवणारा 'तो' आवाज, गजल सम्राट जगजीत सिंह