एक्स्प्लोर

Jagjit Singh : 'गालिब'ला घराघरात पोहोचवणारा 'तो' आवाज, गजल सम्राट जगजीत सिंह

Ghazals of Mirza Ghalib Jagjit Singh: जेव्हा निरव शांततेत 'दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...' मिर्झा गालिब यांची ही गजल जगजीत सिंह यांच्या आवाजात कानावर पडते, तेव्हा मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

Ghazals of Mirza Ghalib Jagjit Singh: जेव्हा निरव शांततेत 'दिल-ए-नादाँ तुझे हुआ क्या है...' मिर्झा गालिब यांची ही गजल जगजीत सिंह यांच्या आवाजात कानावर पडते, तेव्हा मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. ही फक्त या गजलेच्या बोलाची नाही, तर तिला एक सुंदर चाल लावून आपल्या आवाजातून घराघरात पोहोचवणाऱ्या जगजीत यांचीही कमाल आहे. जगत सिंह यांचा आवाज म्हणजे जादूच. त्यांनी साध्यातले साधे बोल असलेली गजलही आपल्या आवाजात गायली, तरी ती अनेक रसिक प्रेक्षकांच्या काळजाला भिडून जात होती. गजलेलाल कंटाळवाणा प्रकार मानणारा आज मोठा तरुण वर्ग गजल ऐकू लागला आहे. याचं मोठं श्रेय जगजीत सिंह यांना दिलं तर वावगं ठरणार नाही. आज म्हणजेच 10 ऑक्टोबर 2022 रोजी लोकप्रिय गझल गायक जगजीत सिंह यांना जगाचा निरोप घेऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी गालिबला घराघरात पोहोचवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल आपण जाणून घेणार आहोत.  

जगजीत सिंह आणि प्रसिद्ध कवी, गीतकार गुलजार यांची मैत्री जगजाहीर आहे. गुलजार हे मिर्झा गालिब यांचे खूप मोठे चाहते आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातली बरीच वर्षे गालिब यांचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. गुलजार यांनी 1988 साली मिर्झा गालिब यांच्या आयुष्यावर आधारित एक मालिकेची निमिर्ती केली होती. त्यावेळी गालिब यांच्या अतिशय कठीण उर्दू आणि पर्शियन गजला गाऊन गालिबला त्यांच्या निधनाच्या दोन शतकांनंतर जगभर घरोघरी पोहोचवण्याचं काम गुलजार आणि जगजीत सिंह यांनी केलं. या मालिकेत गालिब यांची मुख्य भूमिका नसीरुद्दीन शाह यांनी साकारली होती. या मालीकेच्या माध्यमातून उर्दू न जाणणाऱ्या नवीन पिढीला गालिब जगजित सिंह यांच्यामुळेच कळला आणि त्यांच्यापर्यंत पोहोचला, असे म्हणायला हरकत नाही. 

जगजीत सिंह यांनी देशभरात आणि जगभरात गालिब यांच्या गजलांचे अनेक कार्यक्रम देखील केले. गालिब यांचं साहित्य घराघरात पोहोचावं म्हणून गुलजार आणि गालिब यांनी मिळून 'तेरा बयां गालिब' हा आणि असे अनेक  म्युझिक अल्बम देखील काढले. उर्दू कळत नसलेल्या लोकांनाही उर्दू गजलेची ओढ लावण्याचं काम फक्त जगजीत सिंह यांच्या सुरमयी आवाजामुळे होऊ शकलं.  

गालिब मालिकेतील जगजीत सिंह यांनी गायलेल्या गजल 
 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Ranbir kapoor Angry On paps: 'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
'खूप बोलतोयस तू ' रणबीर कपूरने पापाराझींवर भडकला, बोट दाखवत म्हणाला...; रामायणाच्या इव्हेंटनंतर काय घडलं? Video
Bigg Boss fame Divya Shinde Arrest: 'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेला अटक! 5 लाखांची खंडणी, जेष्ठ डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण, नेमकं घडलंय काय?
Virender Sehwag Sara Gurpal: 'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
'क्रिकेटर्स मला मेसेज करतात'; Reality शोमध्ये दाखवले चॅट, वीरेंद्र सेहवाग म्हणाले, 'म्हणून रन होत नाहीत...'
OTT Trending Web Series: OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल
OTT वरची 7 एपिसोडची ही सायको थ्रिलर अजिबात चुकवू नका, रिलीज होताच 1 नंबरला होतेय ट्रेंड, ठासून भरलेला सस्पेन्स खिळवून ठेवेल

व्हिडीओ

Mumbai Gas Leakage : गॅसगळती जीवावर, सुरक्षा वाऱ्यावर, रडारवर महापालिकेचे अधिकारी | Special Report ABP Majha
Urban Naxal News : शहरी नक्षलवादाची कहाणी, शरणागत नक्षलीची जुबानी | Special Report ABP Majha
Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Death Certificate New Rules : मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
मृत्यू दाखल्याबाबत मोठा बदल! 1 ऑक्टोबरपासून बदलणार 'हे' कडक नियम; उशिरा नोंदणी करणाऱ्यांना अडचणी
Satara Bus Accident : कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात सोलापूरच्या बसचा ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधान राखल्यानं 32 प्रवाशांचा जीव बचावला
कास पठारावरुन परत येताना यवतेश्वर घाटात बसचा ब्रेक फेल, चालकाच्या दक्षतेमुळं 32 प्रवाशांचा जीव वाचला
Shubman Gill : चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
चौकार मारत शतकाला गवसणी, कॅप्टन शुभमन गिलची दमदार खेळी, विराट कोहलीकडून खास अभिनंदन
Diwali Chhath Special Trains : छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
छटपूजा, दिवाळीसाठी मुंबई-पुण्यातून यूपी-बिहारसह विविध ठिकाणी 418 विशेष रेल्वे गाड्या, गोरखपूरला 64 फेऱ्या, असे असेल नियोजन
Election : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र,गुप्त बैठकीत  निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खलबतं
अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी कट्टर राजकीय विरोधक विखे - थोरात एकत्र, संगमनेरमध्ये गुप्त बैठकीत खलबतं
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
नेपाळमध्ये पुन्हा भूस्खलनाचा थरकाप; थायलंडमध्येही महापुराचा कहर, बँकॉकसह 50 जिल्ह्यात आणीबाणी, हजारो कार पाण्यात, रस्त्यांवर साप फिरू लागले
AC TV Price Hike : ग्राहकांना मोठा धक्का, 1 ऑक्टोबरपासून एसी, टीव्ही आणि वॉशिंग मशीनचे दर वाढणार, 2026 मध्ये तिसऱ्यांदा महागाईचा चटका 
1 ऑक्टोबरपासून AC, TV सह वॉशिंग मशीन महागणार,ग्राहकांना वर्षभरात तिसऱ्यांदा महागाईचा धक्का 
Solapur Drought: डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
डोळ्यादेखत डाळिंबाचं उभं पीक करपलं, रान कोरडंठाक पडलं, सांगोल्यात दुष्काळाचे भीषण वास्तव, आता जगायचं कसं? शेतकऱ्याचा सवाल
Embed widget