एक्स्प्लोर
जॅकलिन फर्नांडिस चाहत्यांना धक्का देणार
मुंबई : बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या सिनेमांत रोमँटिक भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला आता काहीतरी हटके करण्याची इच्छा आहे. खलनायिकेची भूमिका करून आपल्या चाहत्यांना घाबरवण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
ढिशूम या सिनेमानंतर जॅकलिन फर्नांडिसचा आगामी सिनेमा 'फ्लाइंग जाट' 25 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या फिल्ममध्ये टायगर श्रॉफ देशी सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार आहे.
वेगवेगळ्या सिनेमात प्रत्येकवेळी रोमँटिक भूमिका करून कंटाळल्याने, तिला आता काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे.
गेल्या सात वर्षांपासून तिने बॉलिवूडमध्ये किक, हाऊसफुल सारखे सिनेमे दिले आहेत. इतकी वर्ष ग्लॅमरस रोल केल्यानंतर काहीतरी हटके करण्याची तिची इच्छा आहे.
दरम्यान फ्लाइंग जाटबद्दल विचारलं असता आपल्याला सुपरहिरो आणि त्याची जादू खूप आवडते. या सिनेमात सुपरहिरोची भूमिका करणारा टायगर खूप सपोर्टिव्ह आणि एक चांगला सहकलाकार असल्याचं तिने सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement