एक्स्प्लोर
कुठे 2400 तर कुठे 1500 रुपये तिकीट, विरोध झुगारुन 'पद्मावत'ला गर्दी
दरम्यान, बहुचर्चित 'पद्मावत' अखेर आज प्रदर्शित होत आहे. मात्र करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई : 'पद्मावत' सिनेमा तुम्ही पाहायचा प्लॅन तर केलाच असेल. पण हा सिनेमा तुम्हाला पाहायचा असेल तर खिसा रिकामा करावा लागणार आहे. कारण 'पद्मावत'चं एक तिकीट हजाराच्या वर आहे. त्यामुळे जर कुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत जाणार असाल तर चांगलाच खड्डा पडणार आहे.
मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह सर्वच शहरात तिकीट हजाराच्या वर आहे. ठाण्यात तर 1 हजार 800 पर्यंत तिकीटाचे दर आहेत. इतकं असूनही ऑनलाईन तिकीटाची विक्री वाढली आहे. विशेष म्हणजे सगळी तिकीटांची विक्री झाली असून थिएटर्स हाऊसफुल्ल आहेत.
रिव्ह्यू: भव्य, रेखीव, नेत्रदीपक - पद्मावत
देशभरातील थिएटरमधील 'पद्मावत'चे दर
मुंबई - पीव्हीआर वर्सोवा - 1030 रुपये
मुंबई - आयनॉक्स नरिमन पॉईंट - 1550 रुपये
मुंबई - आयनॉक्स वरळी - 1550 रुपये
ठाणे - सिनोपोलिस व्हिव्हियाना मॉल - 1000 रुपये
पुणे - आयनॉक्स बंड गार्डन - 780 रुपये
नाशिक - सिनेमॅक्स सिटी सेंटर मॉल - 530 रुपये
दिल्ली - डायरेक्टर्स कट अॅम्बियन्स - 2400 रुपये
बंगळुरु - पीव्हीआर सेंट्रल स्पिरीट मॉल - 580 रुपये
हैदराबाद - बीव्हीके मल्टिप्लेक्स - 230 रुपये
या’ चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ प्रदर्शित करणार नाही : मल्टिप्लेक्स असोसिएशन
चार राज्यांमध्ये 'पद्मावत'चं प्रदर्शन नाही
दरम्यान, बहुचर्चित 'पद्मावत' अखेर आज प्रदर्शित होत आहे. मात्र करणी सेनेच्या विरोधामुळे राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोवा या चार राज्यांमध्ये 'पद्मावत' सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशभरात मल्टिप्लेक्स असोसिएशनच्या सुमारे 1800 ते 2 हजार स्क्रीन आहेत. त्यामुळे चार राज्यातील प्रदर्शन बंद राहिल्यास ‘पद्मावती’ सिनेमाला फटका बसण्याची शक्यता आहे.
दीपिका, शाहिद आणि रणवीर प्रमुख भूमिकेत
राणी पद्मिनी अर्थात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदुकोन असून शाहिद कपूरने राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीची व्यक्तिरेखा साकारली आहे. पद्मावत चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
रणवीर सिंह पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.
घूमरचं नवं व्हर्जन
दीपिकाच्या ‘घूमर’ गाण्याचंही नवं व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. आधी या गाण्यात दीपिकाची कंबर दिसत होती. मात्र सेन्सॉर बोर्डाने सुचवलेल्या बदलांनंतर नव्या गाण्यात दीपिकाची कंबर झाकण्यात आली आहे. शिवाय यूट्यूबवरुनही जुनं गाणं हटवण्यात आलं आहे. गाण्यात ज्या ठिकाणी दीपिकाची कंबर दिसत आहे, ते कम्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून लपवलं आहे.
संबंधित बातम्या
'पद्मावत' सिनेमाच्या पाठिंब्यावरुन मनसेमध्ये फूट
'पद्मावत'ला करणी सेनेचा विरोध कायम, 25 जानेवारीला 'भारत बंद'ची हाक
'घूमर' गाणं नव्याने रिलीज, दीपिकाची कंबर झाकून गाण्याचं नवं व्हर्जन
'पद्मावत' सिनेमा निरर्थक, अजिबात पाहू नका : ओवेसी
'पद्मावत'च्या निर्मात्यांना दिलासा, सर्व राज्यात प्रदर्शित होणार!
चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’वर बंदी, निर्माते सुप्रीम कोर्टात
केजीतील विद्यार्थ्याचा घूमर डान्स, करणी सेनेकडून शाळेत तोडफोड
‘पद्मावत’ची अधिकृत रिलीज डेट अखेर जाहीर
अखेर मोठ्या वादानंतर ‘पद्मावत’ सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज
'घूमर'मध्ये दीपिकाची कंबर दिसणार नाही, बोर्डाच्या सूचनेनंतर बदल
'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींकडून वृत्ताचा इन्कार
म्हणून 'पद्मावती'चं नाव 'पद्मावत' करण्याची सूचना : प्रसून जोशी
‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
… तर पद्मावती रिलीज होऊ देणार नाही, यूपीचे उपमुख्यमंत्रीही विरोधात
‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज
सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज
रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement