एक्स्प्लोर
इंटरनेट सेन्सेशन प्रियाविरोधात भावना दुखावल्याची तक्रार
'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप काही तरुणांनी केला आहे.

हैदराबाद : इंटरनेट सेन्सेशन प्रिया वारियर अवघ्या काही तासात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे, मात्र हैदराबादमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीमुळे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रियासह चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हैदराबादमध्ये मुस्लिम समाजातील काही तरुणांनी प्रिया वारियरविरोधात फलकनुमा पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. मात्र तक्रारीत प्रियाविरोधात कोणतेही आरोप नाहीत. 'मणिक्या मलराया पूर्वी' या गाण्याचं इंग्रजीत भाषांतर केल्यानंतर मोहम्मद पैगंबरांचा अवमान होत असल्याचा दावा तरुणांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप एफआयआर दाखल केलेला नाही. यूट्यूबवर गाण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अवघ्या 20 तासांतच 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स या गाण्याला मिळाले. 50 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी त्या कालावधीत हा व्हिडिओ लाईक केला होता. लाईक्स आणि व्ह्यूजची संख्या तासागणिक वाढतच आहे. काय आहे व्हिडिओ? शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत. ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातील हे गाणं आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं असून व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे. कोण आहे प्रिया प्रकाश वारियर? प्रिया प्रकाश वारियर. प्रिया अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे. पाहा व्हिडिओ :
संबंधित बातम्या :
आधी डोळे, आता गन शॉट, प्रिया वॉरियरचा नवा व्हिडीओ
'नॅशनल क्रश' प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या
प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!
डोळा मारणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण?
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























