एक्स्प्लोर
हृतिक रोशन इस्तंबुल हल्ल्यातून थोडक्यात बचावला!
इस्तंबुल : तुर्कीच्या इस्तंबूल विमानतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन थोडक्यात बचावला आहे. हल्ल्याच्या काही काळ आधी हृतिक विमानतळावरच होता. तो तिथून निघाल्यानंतर हल्ला झाला. याची माहिती स्वत: हृतिकने ट्विटरच्या माध्यमातून दिली.
तुर्कीत विमानतळावर आत्मघाती हल्ला, 36 जणांचा मृत्यू
तुर्कीमधील इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला घडवून आणला आहे. या हल्ल्यात जवळपास 36 नागरिकांना जीव गमवावा लागला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत. इस्तंबुल विमानतळावर ज्यावेळी तीन आत्मघातकी हल्ले झाले, त्याच्या काहीवेळ आधी तो विमानतळावर होता.तुर्कीतील इस्तंबुल विमानतळाला आंतरराष्ट्रीय महत्त्व...
हृतिकने रात्री 2.7 मिनिटांनी पहिला ट्वीट केला. हृतिकच्या ट्वीटनुसार, "इस्तांबुलहून भारतात परतण्याची फ्लाईट काही कारणामुळे चुकली. आता विमानतळावर अडकलोय कारण पुढची फ्लाईट दुसऱ्या दिवशी आहे." https://twitter.com/iHrithik/status/747891763176669184 हृतिकला हल्ल्याची माहिती मिळताच त्याने या घटनेवर दु:ख व्यक्त करत दहशतवादाविरोधात एकजूट होण्याचं आवाहनही केलं. https://twitter.com/iHrithik/status/747978545201283072 हृतिक मुलांसह स्पेन आणि आफ्रिकेला सुट्टीसाठी गेला होता. सुट्टी संपवून तो इस्तंबुलहून भारतात परतण्यासाठी फ्लाईट पकडण्यासाठी विमानतळावर आला होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement