एक्स्प्लोर
‘बाहुबली 2’चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई

नवी दिल्ली : मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’ प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाची प्रेक्षकांना किती उत्सुकता होती, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहिल्यावर लक्षात येतं. पहिल्याच दिवशी इतिहास रचत रेकॉर्ड ब्रेक कमाई ‘बाहुबली 2’ने केली आहे. बाहुबलीनं पहिल्याच दिवसात भारतात 121 कोटींची कमाई केली आहे. यात हिंदी 41 कोटी, तामिळ तेलुगु आणि मल्याळम 80 कोटींच्या कमाईचा समावेश आहे. करण जोहरनं ट्विट करुन पहिल्या दिवसाची आकडेवारी जाहीर केली आहे. https://twitter.com/karanjohar/status/858336056810381312 दुसरीकडे ‘बाहुबली 2’ सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 201 कोटींचा गल्ला जमवला आहे.
सलमानच्या ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, तर आमीरच्या ‘दंगल’ने 29.78 कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ सिनेमा जगभरात जवळपास 9 हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, मूळ तेलुगूतील हा सिनेमा हिंदीसह अन्य सहा भाषांमध्येही रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर : संबंधित बातम्या :
मूव्ही रिव्यू : बाहुबली 2 : द कनक्लुजन
फिल्म मार्केट अनॅलिस्ट तरन आदर्श यांच्या माहितीनुसार, ‘बाहुबली 2’च्या हिंदी व्हर्जनच्या पहिल्या दिवसाच्या हिंदी व्हर्जनची कमाई सलमान खानच्या ‘सुलतान’ आणि आमीर खानच्या ‘दंगल’ सिनेमालाही मागे टाकणारी आहे.
सलमानच्या ‘सुलतान’ने पहिल्या दिवशी 36.54 कोटी, तर आमीरच्या ‘दंगल’ने 29.78 कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली 2’ सिनेमा जगभरात जवळपास 9 हजार स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला असून, मूळ तेलुगूतील हा सिनेमा हिंदीसह अन्य सहा भाषांमध्येही रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर : संबंधित बातम्या : उस्मानाबादेत टुरिंग टॉकिजमध्ये बाहुबली 2, तिकीट अवघं..
अंडरटेकरची भेट, ते मानधन, 'बाहुबली'च्या 15 फॅक्ट्स !
'बाहुबली 2' पैसा वसूल, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
आणखी वाचा























