Hemant Dhome : "आपल्याच महाराष्ट्रात मराठी सिनेमा बाजूला पडतोय"; थिएटर मालकांवर हेमंत ढोमेने साधला निशाणा
Hemant Dhome : हेमंत ढोमेने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मराठी सिनेमांवर होणाऱ्या अन्यायावर भाष्य केलं आहे.
Hemant Dhome : मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे (Hemant Dhome) सध्या 'सनी' या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान त्याच्या ट्वीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. गेल्या काही दिवसांत मराठी सिनेमांना सिने-प्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण तरीही बॉक्स ऑफिसवर मराठी सिनेमांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणारं हेमंत ढोमेचं ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.
हेमंत ढोमेने प्रेक्षकाच्या तिकिटाचे पैसे परत केल्याच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्वीट केलं आहे,पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी...या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे...शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय...लोक 'सनी' या सिनेमाची तिकीटं काढत आहेत. पण शोज कॅन्सल केले जात आहेत".
पुन्हा एकदा महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची गळचेपी… या राज्यात मराठी सिनेमासाठी जर आता एक शो मिळवायला झगडावं लागत असेल तर कठीण आहे! शुक्रवारी लागलेला सिनेमा दुसऱ्या दिवशी निघतोय! लोक सनी या चित्रपटाची तिकीटं काढतायत आणि शोज कॅन्सल केले जात आहेत!
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
मराठी सिनेमासाठी कडक कायदा हवाच! pic.twitter.com/Pj0b023E3Q
दुसऱ्या एका पेक्षकाच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत हेमंतने लिहिलं आहे,"दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवून कळवलयं की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत?". हिंदी सिनेमा चालतोय त्याला आमची काहीच हरकत नाही. उलट मनापासून शुभेच्छा आहेत आणि आनंददेखील. कारण संपूर्ण सिनेसृष्टीसाठी ती एक सकारात्मक गोष्ट आहे. पण यात आपल्याच महाराष्ट्रात आपला मराठी सिनेमा बाजुला पडतो आहे.
दुसऱ्या एका प्रेक्षकाला तर संदेश पाठवुन कळवलंय की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील! आता आम्ही प्रेक्षकांना कसा दोष द्यायचा की प्रेक्षक जात नाहीत? ⬇️ pic.twitter.com/9fSxLKMy7y
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
हिंदी सिनेमा चालतोय त्याला आमची काहीच हरकत नाही उलट मनापासुन शुभेच्छा आहेत आणि आनंद देखील आहे… कारण संपुर्ण चित्रपटसृष्टी साठी ती एक सकारात्मक गोष्ट आहे, पण यात आपल्याच महाराष्ट्रात आपला मराठी सिनेमा बाजुला पडतोय… #मराठी pic.twitter.com/0UOHh1cEcX
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) November 20, 2022
'सनी' सिनेमाचं कथानक काय?
घरापासून लांब गेलेल्या ललित प्रभाकराला म्हणजेच 'सनी'ला क्षणोक्षणी घरच्यांची, त्याच्या मित्रांची आठवण येत आहे. ज्या गोष्टी घरी असताना त्याला क्षुल्लक वाटत होत्या, त्याचे महत्व त्याला घरापासून लांब गेल्यावर उलगडत आहे. 'होमसिक' बनलेल्या 'सनी'चा एक भावनिक प्रवास 'सनी' या सिनेमात दाखवण्यात आला आहे.
घरापासून लांब राहणाऱ्या आणि आपल्या मातीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला हा सिनेमा आवडेल. 'नाचणार भाई' आणि 'रात ही' ही सिनेमातील दोन गाणी गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. दोन्ही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. 'सनी' या सिनेमात चिन्मय मांडलेकर आणि ललित प्रभाकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या