एक्स्प्लोर
तनुश्री दत्ताला हार्वर्ड्समधून आमंत्रण, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
16 फेब्रुवारी रोजी इंडिया काँग्रेस कॉन्फरन्स 2019, हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एका फ्लॅगशिप कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमाला तनुश्री दत्ता हिला संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
मुंबई : भारतात मीटू चळवळीची सुरुवात करणारी बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताला बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्यावतीने आयोजित एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत तिने स्वत: इंस्टाग्रामवर पोस्ट करुन माहिती दिली आहे.
तनुश्रीने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मैसाचुसेट्सच्या बोस्टनमधील हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका कार्यक्रमात मला संवाद साधण्यासाठी आमंत्रित केले आहे.' 16 फेब्रुवारी रोजी इंडिया काँग्रेस कॉन्फरन्स 2019, हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि हार्वर्ड केनेडी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एका फ्लॅगशिप कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याच कार्यक्रमाला तनुश्री दत्ता हिला संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलं आहे.
तनुश्री दत्ताने 2018 मध्ये ज्येष्ठ नाना पाटेकर यांच्यावर पूर्वी केलेल्या आरोपाचं पुनर्रउच्चार करत मीटू चळवळीची सुरुवात केली होती. 'हॉर्न ओके' या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी छेडछाड केल्याचा आरोप तनुश्रीने केला होता. तनुश्राने सुरु केलेल्या चळवळीनंतर #मीटू अशी चळवळ सुरु झाली होती. अनेक महिलांनी आपल्यावर झालेल्या शोषणाबद्दल जाहीररित्या सांगितलं होतं. यामध्ये बॉलिवूडसह अनेक दिग्गज मंडळीची नावं समोर आली होती. यात संस्कारी बाबूजी म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोकनाथ यांच्यावरही लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement