एक्स्प्लोर

Happy Birthday Sunny Deol : पहिल्या चित्रपटाआधीच सनी देओलने गुपचूप उरकले होते लग्न, अभिनेत्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Sunny Deol Birthday : सशक्त अॅक्शन सीक्वेन्स आणि जबरदस्त संवादांसाठी ओळखला जाणारा सनी सध्या राजकारणी आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका करत आहे.

Sunny Deol Birthday : अॅक्शन स्टार सनी देओलचा (Sunny Deol) आज 65 वा वाढदिवस आहे. सशक्त अॅक्शन सीक्वेन्स आणि जबरदस्त संवादांसाठी ओळखला जाणारा सनी सध्या राजकारणी आणि अभिनेता अशा दोन्ही भूमिका करत आहे. सनी देओलला 90च्या दशकात लोकांच्या मनामध्ये जागा मिळाली होती. जवळपास 100 चित्रपटांमध्ये काम केलेल्या सनीला लहानपणापासूनच वडील सुपरस्टार धर्मेंद्र यांच्यासारखे यशस्वी अभिनेता व्हायचे होते आणि वडिलांचीही तीच इच्छा होती.

19 ऑक्टोबर 1965 रोजी धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या थोरल्या मुलाचा जन्म झाला. या मुलाचे नाव ठेवण्यात आले होते अजय सिंह देओल. नंतर लोक त्याला सनी म्हणू लागले. हे नाव इतकं प्रसिद्ध झाले की. अजय सिंह देओल पुढे सनी देओल म्हणूनच ओळखला जाऊ लागला. सनीचे वडील धर्मेंद्र हे 70च्या दशकातील सुपरस्टार होते आणि त्यानेही ही परंपरा पुढे नेली. सनीने 1983मध्ये आलेल्या 'बेताब' चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. रोमँटिक चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सनीची प्रतिमा अॅक्शन आणि एंग्री हिरो अशी झाली. सनी देओलला बॉलिवूडचा सर्वात मोठा अॅक्शन हिरो म्हणून ओळखले जाते. अभिनयानंतर सनी देओलने राजकारणातही प्रवेश केला आहे. ते गुरुदासपूरचे खासदार आहेत.

‘गदर’ची क्रेझ!

सनी देओलच्या काही सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये बॉर्डर, गदर, अर्जुन, सल्तनत, डकैत, त्रिदेव, चालबाज, विष्णू देवा, अपने, यमला पगला दिवाना यांचा समावेश आहे. ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सनी देओलच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. या चित्रपटाची लोकांमध्ये इतकी क्रेझ होती की, चित्रपटगृहात जागा न मिळाल्यावर लोक चित्रपटासाठी उभे देखील राहिले.  यामुळे सकाळी 6 वाजता ‘गदर: एक प्रेम कथा’चा पहिला शो सुरू झाला. ‘गदर : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने भारतात सर्वाधिक तिकिटे विकण्याचा विक्रम केला होता. या चित्रपटाचे संगीतही चांगलेच विकले गेले होते.

लपवून ठेवली लग्नाची बाब!

पदार्पण करण्यापूर्वीच सनी देओलने पूजासोबत गुपचूप लग्न केले होते. 'बेताब' रिलीज होण्याआधी सनीच्या लग्नाची बाब लपवून ठेवण्यात आली होती. कारण त्याचा त्याच्या रोमँटिक इमेजवर नकारात्मक परिणाम होऊ शकत होता. शूटिंगमधून ब्रेक घेऊन सनी पत्नीला भेटण्यासाठी लंडनला जायचा. नंतर सनीला मीडियासमोर आपण विवाहित असल्याची कबुली द्यावी लागली होती. सनी देओलचे नाव त्या काळातील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले असले, तरी डिंपल कपाडियासोबतचे त्यांचे नाते दीर्घकाळ टिकले. 1982 मध्ये राजेश खन्ना यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर डिंपल सनीच्या जवळ आली. दोघेही जवळपास 11 वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. नंतर हे जोडपे वेगळे झाले. 2017 मध्ये दोघे पुन्हा एकत्र दिसले होते.

हेही वाचा :

Entertainment News Live Updates 19 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'

व्हिडीओ

Solapur Congress : सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Uddhav Thackeray on BJP :  काहीही झाले तरी भाजपला हरवणारच, 16 तारखेला जल्लोष करायचय, उद्धव ठाकरेंचा घणाघात
Sharad Pawar - Ajit Pawar : अदानींना फ्रेम देताना सहज सावरलं, पवार काका-पुतण्यामधलं प्रेम दिसलं
Ajit Pawar Welcome Adani : गौतमभाईsss वेलकम टू बारामती... अजितदादांकडून उत्साहाने अदानींचं स्वागत
Rohit Pawar - Ajit Pawar - Gautam Adani : रोहित पवार,अजित पवार आणि अदानींचा एकाच गाडीतून प्रवास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
नऊवारीत आई अन् घोंगडं घेतलेला बाप जेव्हा IPS लेकासोबत पहिल्यांदा विमानातून प्रवास करतात, पाहा फोटो
Solapur Municipal Election: सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षांसह पाच नव्या चेहऱ्यांना संधी
Sangli News: तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
तासगाव, सांगलीत अफगाणिस्तानातून तस्करी केलेला, घातक केमिकलचा वापर करून बनवलेला बेदाणा विक्रीस
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी जाहीर झालेल्या उमेदवाराचा MIM मध्ये प्रवेश; समोर आलं राज'कारण'
Satej Patil: तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
तर त्या नवनियुक्त नगरसेवकाचा त्याच दिवशी राजीनामा घेणार! सतेज पाटलांचा काँग्रेस उमेदवारांना थेट गर्भित इशारा
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत 'मुंबई मॉडेल'चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?
Pune Crime News: पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुणे विमानतळाजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची पहाटे मोठी कारवाई; 50 जणांना घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Embed widget