(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pankaj Tripathi | पंकज त्रिपाठी यांचे हे 5 परफॉर्मन्स विसरणे खूप कठीण; तुम्हीही हे सिनेमे पाहिले असतील
Pankaj Tripathi Five Best Performances: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत, त्यांच्या अभिनयाचे कोट्यवधी चाहते आहेत.
Pankaj Tripathi Five Best Performances: पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) आज 5 सप्टेंबर रोजी आपला 45 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज पंकज त्रिपाठी त्यांच्या दमदार कामगिरीमुळे कोट्यवधींच्या हृदयांवर राज्य करत आहेत. 'मिर्झापूर' असो किंवा 'स्त्री', त्यांनी प्रत्येक पात्रात जीव ओतला आहे. पंकज त्रिपाठी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्वोत्तम पात्रांवर एक नजर टाकूया.
GURGAON: पंकज त्रिपाठी यांनी दिग्दर्शक शंकर रमन यांच्या 'गुडगाव' चित्रपटात उत्तम काम केले. पंकज या चित्रपटात ब्रँडो-एस्क बिझनेस टायकून म्हणून दिसला. हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला.
KAAGAZ: 'कागज' चित्रपट पाहण्याचे एकमेव कारण म्हणजे पंकज त्रिपाठी. 'कागज' ही उत्तर प्रदेशातील एका माणसाची अतिशय मजेदार आणि हृदयस्पर्शी कथा आहे, जिने आपल्या जिवाचे 18 वर्षे तो जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी खर्च केले. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत होता.
GUNJAN SAXENA-THE KARGIL GIRL: पंकज त्रिपाठीने या चित्रपटात जान्हवी कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. तो आपल्या मुलीला स्वावलंबी होण्यासाठी तयार करतो. या चित्रपटातील अभिनेत्याने आपल्या कामाने सर्वांची मने जिंकली.
MIMI: पंकजच्या कॉमिक टायमिंगबद्दल सर्वांना माहिती आहे. क्रिती सेननचा 'मिमी' हा चित्रपट पंकज त्रिपाठीच्या दमदार अभिनयाशिवाय अपूर्ण राहिला असता. क्रिती सेननसोबत पंकजचा हा दुसरा चित्रपट होता. यापूर्वी दोघांनी 'बरेली की बर्फी' मध्ये काम केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मिमी सिनेमाची चांगली चर्चा रंगली होती. या सिनेमात क्रिती सेननसोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची चर्चा अशासाठी की हा सिनेमा मराठी चित्रपटावर बेतला आहे. या चित्रपटातही पंकज त्रिपाठी यांनी उत्तम अभिनय केला आहे.
NEWTON: या ओव्हररेटेड चित्रपटात पंकज त्रिपाठीने लोकांचे भरपूर मनोरंजन केले. राजकुमार रावनेही मुख्य भूमिकेत उत्तम काम केले.