Grammy Awards 2023 : Beyonce नं रचला इतिहास; कलाकारांच्या स्वप्नातला ग्रॅमी 32 वेळा जिंकला
Grammy Awards 2023 : 'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे. हा ग्रॅमी पुरस्कार जिंकून तिनं इतिहास रचला आहे.
Grammy Awards 2023: 'ग्रॅमी पुरस्कार' (Grammy Awards 2023) हा संगीतक्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला असून 'ग्रॅमी पुरस्कार' वर प्रसिद्ध पॉप स्टार बियॉन्सेनं (Beyonce) आपलं नाव करलं आहे. बियॉन्सेनं 65 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात आपल्या करिअरमधील 32 वा ग्रॅमी पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. बियॉन्सेला इलेक्ट्रॉनिक म्युझिक अल्बम या कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळाला आहे.
32 ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी बियॉन्से ही जगभरातील अशी एकमेव सेलिब्रिटी आहे. तिनं हंगेरियन-ब्रिटीश कंडक्टर जॉर्ज सोल्टी (Georg Solti) यांना मागे टाकलं आहे. जॉर्ज सोल्टी यांनी 31 ग्रॅमी पुरस्कार जिंकले आहेत. त्यांचा हा रेकॉर्ड 20 वर्ष कोणीही मोडला नव्हता. एका सोहळ्यात सर्वाधिक ग्रॅमी जिंकणारा मायकल जॅक्सन हा कलाकार आहे.
पुरस्कार स्विकारल्यानंतर बियॉन्सेनं आपल्या भावना व्यक्त केल्या. बियॉन्सेनं तिच्या कुटुंबाचे आभार मानले. 'माझ्या आई-वडिलांनी मला आयुष्यात पुढे जाण्यास मदत केली. मी त्यांचे आभार मानते. मी माझ्या वडिलांचे, माझ्या तीन मुलांचे आभार मानते. जे घरामधून मला बघत आहेत.' असं बियॉन्से म्हणाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून बियॉन्सेचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.तसेच जगभरातील कलाकार आणि प्रेक्षक तिचं कौतुक करत आहेत.
#beyonce is now the biggest #grammy winner in history. She just won her 32nd. pic.twitter.com/BboUSEztXK
— Michael Weinfeld (@mweinfeld) February 6, 2023
बियॉन्सेचा लूक
बियॉन्सेनं 'ग्रॅमी पुरस्कार' सोहळ्यासाठी खास लूक केला होता. यावेळी तिनं सिल्वर ब्राऊन ड्रेस, हाय हिल्स आणि ब्लॅक ग्लव्ह्ज् असा क्लासी लूक तिनं पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता.
पाहा फोटो:
View this post on Instagram
संगीत क्षेत्रातील मानाचा पुरस्कार म्हणून ‘ग्रॅमी’चं नाव घेतलं जातं. हा पुरस्कार नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स या संस्थेतर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार हा संगीतक्षेत्रातील सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. जगभरातील संगीतप्रेमींसाठी अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार आहे. भारतीय संगीतकार रिकी केजने (Ricky kej) देखील यंदाचा ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे.
संबंधित बातम्या