![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण
क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानमुळे सध्या अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आहेत.
![Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण gauri khan give comment on religion difference with shahrukhkhan Shahrukh Khan सोबत लग्नानंतरही गौरीनं बदलला नाही धर्म; सांगितलं हे कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/13/103faa80a7ac5b4800d980b1e71ab7cb_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shahrukh Khan-Gauri Khan Bonding: क्रूझ ड्रग्स प्रकरणी अटकेत असणाऱ्या आर्यन खानमुळे सध्या अभिनेता शाहरूख खान आणि त्याची पत्नी गौरी खान चर्चेत आहेत. पण त्यांच्या आणखी एका गोष्टीची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. शोमध्ये कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील सांगतात. गौरीने जेव्हा करणच्या शोमध्ये हजेरी लावली होती तेव्हा तिने धर्माबाबत सांगितले होते.
फोटोमधील 'या' अभिनेत्याला ओळखलं? 'सुपर मॉडेल'चा फोटोपाहून चाहते आश्चर्यचकित
कॉफी विथ करण शोमध्ये गौरीला तिच्या धर्माबद्दल विचारण्यात आले तेव्हा तिने उत्तर दिले, 'शाहरूखचे आई वडिल आज जगात नाहित, पण ते जर आज आमच्यासोबत असते तर आम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांची काळजी घेतली असती ते आमच्यासोबत नसल्याने आम्ही घरी दिवाळी, होळी असे सर्व सण साजरे करतो. त्यामुळे मुलांमध्ये हिंदू धर्माचा इन्फ्यूएन्स जास्त आहे. 'पुढे गौरीला मुस्लिम मुलासोबत लग्नाबद्दल विचारल्यावर तिने सांगितले, 'आम्ही संतुलन ठेवतो. मी शाहरूखच्या धर्माचा आदर करते. पण याचा अर्थ असा नाही की मी मुस्लिम धर्म स्विकारावा. याच प्रमाणे शाहरूखला देखील माझ्या धर्माचा आदर आहे. आम्ही एकमेकांच्या धर्माचा आदर करातो.'
आर्यनला या गोष्टी करण्यासाठी शाहरूखने केलीये सक्त मनाई
मुलासाठी शाहरूखचे कडक नियम
शाहरूखने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, तो त्याच्या मुलाला अशा कोणत्याच सुविधा किंवा अधिकार देणार नाही, जे तो मुलींना देऊ शकत नाही. त्यामुळे शाहरूखने आर्यनला घरात शर्टलेस फिरण्यची परवानगी दिलेली नाही. शाहरूखने सांगितले होते की, जर तुम्हाला मैत्रिणी तसेच आजूबाजूच्या महिलांनी शर्टलेस फिरने मान्य नसेल तर तुम्ही असं कसे समजू शकता की, त्यांना तुम्ही शर्टलेस फिरणे मान्य आहे.
Antim Release Date: आरररर खतरनाक! सलमान खानचा 'अंतिम' चित्रपट या दिवशी होणार रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)