फोटोमधील 'या' अभिनेत्याला ओळखलं? 'सुपर मॉडेल'चा फोटोपाहून चाहते आश्चर्यचकित
सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे.
Milind Soman Share his Childhood pic: प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल असणारा मिलींद सोमण सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. मिलींद त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. वर्क-आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. सोशल मीडियावर मिलींदच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकताच मिलींदने त्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला मीलिंदला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले.
मिलींदच्या फोटोने आणि कॅप्शनने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
मिलींदने त्याचा बालपणीचा फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, ' मी 6 वर्षांचा असताना शेतकरी व्हायचे ठरवले होते. 50 वर्षांनंतर मी शेतकरी झालो. बऱ्यांच वेळा मी असे ऐकले आहे की, भाज्यांना आर्टिफिशल कलर लावला जातो, तसेच फळांना इजेक्शन दिले जाते. त्यामुळे स्वत: भाज्या आणि फळांची शेती करावी. ' मिलींदच्या चाहत्यांनी त्याच्या या फोटोला पसंती दिली असून अनेकांनी लाइक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. मिलींदचा बालपणीचा लूक पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले. मिलींदचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
'सुपर मॉडेल' मिलींद
1995 साली प्रदर्शित झालेल्या अलीशा चिनॉय यांच्या मेड इन इंडिया या गाण्यामुळे मिलींदला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मिलींद मॉडेल झाला. त्याच प्रमाणे अनेक चित्रपट, वेब सिरीज आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये मिलींदने काम केले आहे. सध्या तो 'सुपर मॉडल ऑफ द ईयर 2' या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत दिसतो.
Actor Dharmendra First Car: धरम पाजींनी जपून ठेवलीये पहिली कार; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्
The Ladykiller : आता लेडी किलरच्या भूमिकेत दिसणार Arjun Kapoor,पोस्टर शेअर करत लिहिले...