एक्स्प्लोर
काजोल आणि धनुष यांच्या 'व्हीआयपी 2' चं पोस्टर रिलीज
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अभिनेता धनुष यांच्या वेलई इल्ला पट्टाथरी अर्थात 'व्हीआयपी 2' या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची धाकटी मुलगी सौंदर्याने ट्विटवर चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलं आहे.
"जसं जुनं वर्ष सरलं आणि नवीन वर्ष सुरु झालं आहे, तसंच धनुषच्या सर्व चाहत्यांना माझ्याकडून ही भेट, व्हीआयपी 2चं पहिलं पोस्टर," असं ट्वीट सौदर्याने केलं आहे. सौंदर्यानेच या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सौंदर्या ही धनुषची मेहुणी आहे.
सौंदर्याने सिनेमाचे दोन पोस्टर शेअर केले आहेत. एका पोस्टरमध्ये धनुष चहाच्या टपरीवर हातात सायकलवर दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये धनुष आणि काजोल समोरासमोर उभे आहेत.
https://twitter.com/soundaryaarajni/status/815160238969999361
काजोल 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा दाक्षिणात्य सिनेमात पुनरागमन करत आहे. काजोलने 1997 मध्ये तामिळ चित्रपट 'मिनसारा काना'मधून दक्षिणात्य इंटस्ट्रीत पदार्पण केलं होतं.
सौंदर्या रजनीकांतसोबत माझा सुपरहिट चित्रपट 'व्हीआयपी'च्या सिक्वेन्समध्ये काम करणार आहे, असं धनुषने काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. तर काजोलनेही या सिनेमात काम करण्यासाठी होकार दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement