First Look : '83'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक रिलीज
1983च्या क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्या वेस्ट इंडिजच्या विरूद्ध भारताने दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याच गोष्टीवर आगामी '83' हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
Deepika Padukone First Look 83 : अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षित चित्रपट '83'मधील दीपिका पादुकोणचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या चित्रपटात दीपिका माजी क्रिकेटर कपिल देव यांची पत्नी रूमी देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेड अनॅलिस्ट रमेश बाला यांनी ट्विटरवर दीपिकाचा या चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. यामध्ये दीपिका पादुकोण शॉर्ट हेयरमध्ये दिसून येत आहे. तसेच ती कपिल देव यांची भूमिका साकारत असलेल्या रणवीर सिंहच्या हातात हात घालून उभी आहे.
Here is the FL of @deepikapadukone as #RomiDev - Legendary Cricketer #KapilDev 's wife in #83TheMovie @RanveerOfficial as #KapilDev
They authentically resemble the iconic couple.. pic.twitter.com/IxCqP8tQUd — Ramesh Bala (@rameshlaus) February 19, 2020
चित्रपट '83'मधील आपल्या फर्स्ट लूकमध्ये दीपिका पादुकोणने ब्लॅक कलरच्या हाय नेक टॉपसह बेज कलरचा स्कर्ट वेअर केला आहे. या फोटोमध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण दोघांनाही ओळखणं थोडं अवघड झालं आहे. चित्रपटाबाबत बोलताना दीपिका पादुकोण म्हणाली की, 'खेळाच्या इतिहासातील सर्वात प्रतिष्ठीत क्षणांपैकी एक असलेल्या चित्रपटात छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारणंही सन्मानाची गोष्ट आहे.'
“To play a small part in a film that captures one of the most iconic moments in sporting history has been an absolute honour!83 for me is an ode to every woman who puts her husband’s dream before her own...” #ThisIs83 pic.twitter.com/JHTjQE8KC3
— Deepika Padukone (@deepikapadukone) February 19, 2020
माजी क्रिकेटर आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी बोलताना सांगितले की, सुरुवातीला त्यांची इच्छा नव्हती की, त्यांच्यावर एखादा चित्रपट यावा. त्यांनी सांगितले की, 'जेव्हा मला पहिल्यांदा या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं त्यावेळी माझं पहिलं उत्तर नाही असं होतं. मला अजिबात असं वाटत नव्हतं की, असा कोणता चित्रपट तयार व्हावा. त्यानंतर जेव्हा निर्माता कबीर सिंह याने संपूर्ण कथानकाबाबत माझ्याशी चर्चा केली. त्यावेळी माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर मी काहीच विचार न करता चित्रपटासाठी हो म्हटलं.'
The Wind beneath my Wings ❤ The Heart of the Hurricane.@deepikapadukone #DeepikaAsRomiDev .@83thefilm @kabirkhankk @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt @_KaProductions @FuhSePhantom @NGEMovies @vibri_media @ZeeMusicCompany @PicturesPVR pic.twitter.com/sW8tW649Y9
— Ranveer Singh (@RanveerOfficial) February 19, 2020
दरम्यान, 1983च्या क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्या वेस्ट इंडिजच्या विरूद्ध भारताने दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याच गोष्टीवर आगामी '83' हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका स्क्रिन शेअर करणार आहेत. चित्रपटात ताहिर राज भसीन, एमी विर्क, हार्डी संधु आणि चिराग पटेल यांसारख्या अभिनेत्यांचाही समावेश आहे. हा चित्रपट 10 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे.
#ThisIs83 @kabirkhankk @deepikapadukone @Shibasishsarkar #SajidNadiadwala @vishinduri @ipritamofficial @RelianceEnt @FuhSePhantom @NGEMovies @vibri_media @ZeeMusicCompany @PicturesPVR @83thefilm pic.twitter.com/L0cddcbXbV
— Ranveer Singh (@RanveerOfficial) January 25, 2020
रणवीर सिंह करण जौहरचा आगामी चित्रपट 'तख्त'मध्येही रणवीर दिसून येणार आहे. या मल्टीस्टारर पीरियड ड्रामामध्ये मुघल साम्राज्याची कहानी दाखवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त काही दिवसांपूर्वीच रणवीरने आपला आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चं शुटिंग पूर्ण केलं आहे.
संंबंधित बातम्या :
'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार
रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीजFirst Look : 'लाल सिंह चड्ढा'मध्ये असा असेल करीना कपूरचा लूक; नवं पोस्टर रिलीज
'गंगुबाई काठीयावाडी'च्या रूपातील आलिया भटचा लूक रिलीज