'जयेशभाई जोरदार'मध्ये बोमन ईराणींची एन्ट्री; रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार
आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'मधून डेब्यू करणारे लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठाकूर गुजाराती पार्श्वभूमिवर आधारित एक मनोरंजक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात रणवीर एका गुजराती व्यक्तीरेखेत दिसणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेते बोमन ईराणी आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'मध्ये अभिनेता रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. बोमन ईरानी यांनी स्वतः याबाबात सांगितलं आहे. ते म्हणाले की, 'जयेशभाई जोरदारची स्क्रिप्ट वेगळी आहे. यातून एक जीवंत कथा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. ही स्क्रिप्ट लिहिणाऱ्या लेखकाचं खरचं कौतुक आहे. त्यांनी जे लिहिलं आहे ते वैचारिक असून कॉमेडी आणि मनोरंजनाच्या माध्यामातून एक मजबूत संदेश देण्यात येत आहे.
आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'मधून डेब्यू करणारे लेखक-दिग्दर्शक दिव्यांग ठाकूर गुजाराती पार्श्वभूमिवर आधारित एक मनोरंजक चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात रणवीर एका गुजराती व्यक्तीरेखेत दिसणार आहे.
बोमन ईराणी हे आगामी चित्रपट '83'मध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहेत. तसेच त्यांनी रणवीरला 'पावरहाउस परफॉर्मर' म्हटलं आहे. रणवीर सिंहबाबत बोलताना बोमन ईराणी म्हणाले की, रणवीरसोबत काम करताना नेहमीच मज्जा येते. तो एक पॉवरहाउस परफॉर्मर आहे. जो प्रत्येक दृश्यात आपलं संपूर्ण योगदान देतो. एक कलाकार म्हणून अशा व्यक्तींसोबत काम करण्याचा अनुभव फार सुंदर असतो. मी या चित्रपटात रणवीर सिंहच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. लोकांना आमच्यातील गोड नातं पाहायला मिळणार आहे.'
View this post on Instagram
रणवीर सिंहने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. त्याने शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'जयेशभाई है एकदम जोरदार'. या फर्स्टलूकमध्ये रणवीर सिंह पूर्णपणे गुजराती रंगात रंगून गेलेला आहे. या लूकमध्ये रणवीरने पोल्का डॉट्स असणारा नारंगी आणि काळ्या रंगाचा टि-शर्ट घातला आहे. यामध्ये त्याच्या मागे अनेक महिला उभ्या आहेत. रणवीरच्या मागे उभ्या असलेल्या महिलांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे.
दरम्यान, रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' हा '83' या आगामी चित्रपटानंतर रिलीज होणार आहे. 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट कॉमेडी ड्रामावर आधारीत असणार आहे. तर बहुचर्चित चित्रपट '83'मध्ये रणवीर क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 1983मधील विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय झाला होता, यावर या चित्रपटाचे कथानक आधारलेलं आहे. एवढचं नाहीतर या चित्रपटात दीपिका आणि रणवीर स्क्रिन शेअर करणार असून चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका एकाच चित्रपटात दिसणार आहेत.
संबंधित बातम्या :
रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज
मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत