एक्स्प्लोर
रणवीर सिंहचा गुजराती अंदाज; 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक रिलीज
'जयेशभाई जोरदार' या रणवीर सिंहच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर एका हटके लूकमध्ये दिसून येत आहे.
मुंबई : रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चा फर्स्ट लूक आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये रणवीर सिंहचा लूक फारच वेगळा आहे. या लूकमध्ये रणवीरला ओळखणंही कठिण झालं आहे. त्यामुळे फॅन्समध्ये रणवीरच्या या लूकबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
रणवीर सिंहने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या चित्रपटाचा लूक शेअर केला आहे. त्याने शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'जयेशभाई है एकदम जोरदार'. या फर्स्टलूकमध्ये रणवीर सिंह पूर्णपणे गुजराती रंगात रंगून गेलेला आहे. या लूकमध्ये रणवीरने पोल्का डॉट्स असणारा नारंगी आणि काळ्या रंगाचा टि-शर्ट घातला आहे. यामध्ये त्याच्या मागे अनेक महिला उभ्या आहेत. रणवीरच्या मागे उभ्या असलेल्या महिलांनी डोक्यावर पदर घेतलेला आहे.
रणवीरचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार'चं दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर करत असून तो गुजराती दिग्दर्शक आणि लेखक आहे. हा त्याचा पहिला चित्रपट आहे. चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर करत आहे. या चित्रपटाबाबत बोलताना रणवीर असं म्हणाला की, 'मी या चित्रपटाबाबत फार उत्सुक आहे. जयेश भाई एका वेगळ्या विषयावर अवलंबून असलेला चित्रपट आहे.'View this post on InstagramJAYESHBHAI hain ekdum JORDAAR! 🤓💗💪🏾 #JayeshbhaiJordaar #ManeeshSharma #DivyangThakkar @yrf
रणवीरने आपल्या या चित्रपटाची घोषणाही मजेशीर पद्धतीने केली होती. त्याने एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये रणवीर, दिग्दर्शक दिव्यांगला विचारतो की, 'हॅलो यंग मॅन, नाव काय आहे तुझं...?' याचं उत्तर देताना दिग्दर्शक म्हणतात की, 'माझं नाव दिव्यांग ठक्कर आहे.' पुढे रणवीर त्याला विचारतो की, 'याआधी तू कोणता चित्रपट डिरेक्ट केला होता का?', त्यावर दिव्यांग सांगतो की, 'नाही हा माझा पहिला चित्रपट आहे.'
दरम्यान, रणवीर सिंहचा आगामी चित्रपट 'जयेशभाई जोरदार' हा '83' या आगामी चित्रपटानंतर रिलीज होणार आहे. 'जयेशभाई जोरदार' हा चित्रपट कॉमेडी ड्रामावर आधारीत असणार आहे. तर बहुचर्चित चित्रपट '83'मध्ये रणवीर क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. 1983मधील विश्वचषक स्पर्धेत भारताचा विजय झाला होता, यावर या चित्रपटाचे कथानक आधारलेलं आहे. एवढचं नाहीतर या चित्रपटात दीपिका आणि रणवीर स्क्रिन शेअर करणार असून चाहत्यांसाठी पर्वणीच असणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका एकाच चित्रपटात दिसणार आहेत. संबंधित बातम्या : मार्वेल सिरीजमधील 'ब्लॅक विडो'चा ट्रेलर रिलीज; हॉलीवूड सुपरस्टार स्कार्लेट जोहानसन मुख्य भूमिकेत 'दबंग 3'मधील गाणं रिलीज; सलमान-वरीनासोबत प्रभुदेवाचाही जबरदस्त डान्स Jayalalitha Biopic I 'थलाइवी'चा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित; जयललितांच्या भूमिकेत कंगना 'पहिला वार लाखमोलाचा'; 'तानाजी'चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement