गोव्यात अभिनेत्री पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल; अश्लील वीडियो शूट केल्याचा आरोप
अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरूद्ध गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला शाखेने तक्रार दाखल केली आहे. अश्लील वीडियो शूट केल्याचा आरोप तिच्यावर आहे.

अभिनेत्री पूनम पांडे हिच्याविरूद्ध गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला शाखेने एफआयआर दाखल केला आहे. यासह, एका व्यक्तीकडून कॅनाकोना पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्ती बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडेचा अश्लील व्हिडिओ शूट करत असल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. याप्रकणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एएनआयमार्फत ही माहिती देण्यात आली आहे.
एक धाव अशीही.. मॉडेल अभिनेता मिलिंद सोमणने साजरा केला आपला 55वा वाढदिवस
यापूर्वीही पूनम पांडे चर्चेत
अभिनेत्री पूनम पांडेने नुकतंच तिचा प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले होते. लग्नाच्या 2 आठवड्यानंतर नवदाम्पत्यामध्ये भांडण झांलं. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. हनीमूनवर असताना पती सॅम बॉम्बेने मारहाण केल्याची तक्रार पूनम पांडेने केली होती. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली. त्यानंतर अभिनेत्रीने आपल्या पतीविरूद्धची तक्रार मागे घेतली, त्यानंतर पूनमच्या पतीला जामीन मिळाला. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.
'अंधाधुनमधला तो प्रणय थोडा आणखी चालला असता...' ; आयुषमानच्या पत्नीने मांडली आपली भूमिका
लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर
यापूर्वी अभिनेत्री पूनम पांडेने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. कॅप्शनमध्ये पूनमने तिच्या पतीसाठी लिहिले आहे.. "मला तुमच्याबरोबर सात जन्म राहायचं आहे. पूनम पांडे ही 2011 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर सोशल मीडियावर नग्न फोटो पोस्ट करणार असल्याच्या घोषणेवरून रात्रीतून प्रसिद्ध झाली होती. या अभिनेत्रीने 2013 साली ‘नशा’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्यानंतर ती बर्याच चित्रपटांमध्ये दिसली होती.
























