एक धाव अशीही.. मॉडेल अभिनेता मिलिंद सोमणने साजरा केला आपला 55वा वाढदिवस
मॉडेल अभिनेता मिलिंद सोमणने आपला 55वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे.
मलिंद सोमण.. भारतातला सर्वात सुंदर पुरुष असं बिरूद मिलिंद सोमण यांनी एकेकाळी मिळवलं होतं. आपल्या ऐन तारुणात मिलिंद सोमण यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी मॉडेलिंग केलं होतं. आपल्याला वाटतं तसं जगण्याकडे मिलिंद यांचा कल आधीपासून होता. मिलिंद यांनी आपल्या क्षेत्रात नाव कमावताना त्यांनी अनेक बोल्ड स्टेप घेतल्या होत्या. आता आपला 55वा वाढदिवस साजरा करताना, पुन्हा एकदा मिलिंद यांचं मनस्वी जगणं समोर आलं आहे. त्यांची ही चर्चा सुरू झाली ती त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोनंतर
मिलिंद सोमण यांनी आपल्या 55व्या वाढदिवसानिमित्त एक फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात मिलिंदने समुद्र किनाऱ्यावरून एक धाव घेतली आहे. एरवी ही धाव कुणीही घेतली असती तर फार फरक पडला नसता, पण मिलिंद यांनी ही धाव नागवी घेतली आहे. ही धाव घेताना मिलिंद यांच्या अंगावर एकही कपडा नाहीय. याला न्यूड रन असंही म्हटलं जातं. मिलिंद यांच्या पत्नीने त्याचा हा फोटो काढला असून तिनेही आपल्या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Happy birthday to me 😀 . . . 55 and running ! 📷 @5Earthy pic.twitter.com/TGoLFQxmui
— Milind Usha Soman (@milindrunning) November 4, 2020
बॉलिवूड अभिनेते फराज खान यांचं निधन; वयाच्या 46व्या वर्षी अखेरचा श्वास
मिलिंद नेहमीच मनस्वी जगले आहेत. ऐन तारूण्यात मिलिंद यांनी अनेकदा अशा बोल्ड स्टेप्स घेतल्या आहेत. त्यावेळी मधू सप्रेसोबत त्यांनी केलेलं सापासोबतचं फोटोशूटही बरंच वादग्रस्त ठरलं होतं. आता जवळपास 30 वर्षानंतर पुन्हा एकदा मिलिंदने असं फोटोशूट केलं आहे. हा फोटो ट्विट करताना मिलिंद यांनी हॅप्पी बर्थ डे टू मी असं लिहिलं आहे. तर 55 एंड रनिंग असंही लिहिलं आहे. सोमण यांच्या अशा फोटोशूटमुळे ते पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मिलिंद यांनी बुधवारी सकाळी हा फोटो सोशल मीडियावर टाकला.