'अंधाधुनमधला तो प्रणय थोडा आणखी चालला असता...' ; आयुषमानच्या पत्नीने मांडली आपली भूमिका
बऱ्याचदा इंडस्ट्रीत काम करताना अनेकांसोबत अनेकांची नावं जोडली जातात. तसे गॉसिप्स येतात आणि मग नवरा बायकोत संशय कल्लोळ व्हायची शक्यता असते. पण तुमचा बेटर हाफ जर सुजाण आणि समजूतदार असेल तर मात्र गोष्टी सोप्या होतात. ताहिरा कश्यपचं असंच झालं.
!['अंधाधुनमधला तो प्रणय थोडा आणखी चालला असता...' ; आयुषमानच्या पत्नीने मांडली आपली भूमिका Tahira kashyap feels ayushmann khurrana and radhika aptes lovemaking scene in andhadhun could have been longer 'अंधाधुनमधला तो प्रणय थोडा आणखी चालला असता...' ; आयुषमानच्या पत्नीने मांडली आपली भूमिका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/11/05203215/ayushmann-khurranas-wife-tahira-kashyap1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मनोरंजनसृष्टीत काम करणं हे खायचं काम नसतं. कष्ट वगैरे घ्यायचे असतातच. ते कुणाला चुकलेत म्हणा. पण त्याही पलिकडे इमेज मेंटेन करावी लागते, तब्येत सांभाळावी लागते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं कुटुंब सांभाळावं लागतं. हिरोची भूमिका करणाऱ्या कलाकाराची बायको इंडस्ट्रीतली नसेल तर फार घोळ होतो. नायिकेबाबतही असं घडू शकतं. कारण इंडस्ट्री बाहेरच्या लोकांना इंडस्ट्रीची कल्पना नसते. त्यांना फक्त पडद्यावर जे चालू आहे ते दिसत असतं आणि त्याला ते खरं मानत असतात.
बऱ्याचदा इंडस्ट्रीत काम करताना अनेकांसोबत अनेकांची नावं जोडली जातात. तसे गॉसिप्स येतात आणि मग नवरा बायकोत संशय कल्लोळ व्हायची शक्यता असते. पण तुमचा बेटर हाफ जर सुजाण आणि समजूतदार असेल तर मात्र गोष्टी सोप्या होतात. ताहिरा कश्यपचं असंच झालं. ताहिरा कश्यप फारशी कुणाला माहीत नाही. कारण ती या इंडस्ट्रीतली नाही. पण तिच्या नवऱ्याची ओळख संबंध भारताला आहे. तिच्या नवऱ्याचं नाव आहे आयुषमान खुराना. ताहिराने नव्याने दिलेल्या मुलाखतीने खळबळ उडवून दिली. तिचं म्हणणं असं की, अंधाधुन मध्ये राधिका आपटे आणि आयुषमान यांच्यातलं जे प्रणय दृष्य आहे ते जरा आणखी मोठं हवं होतं. घ्या.. आता काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला वाटेल हे काय... चक्क बायको म्हणतेय नवऱ्यासोबत नायिकेनं केलेलं प्रणय दृश्य जरा मोठं हवं होतं. असं वाटून तुम्ही डोळे आ वासाल यात शंका नाही. पण याचं गणित जरा वेगळं आहे.
ताहिरा या वक्तव्याचं स्पष्टीकरण देताना म्हणते, नवरा म्हणून मला आयुषमान अत्यंत प्रिय आहे. सिनेमातसुद्धा त्याच्या जवळ कुणी आलेलं मला आवडत नसे. पझेसिव्हनेस यायचा. पण एका पॉईंटनंतर मी हे समजून घेतलं की, यात एक आर्टिस्टिक व्हॅल्यू असतो. सिनेमाची गरज म्हणा... किंवा इंडस्ट्रीचा भाग म्हणा. एखादा सीन का शूट केला आहे आणि तो कसा शूट केला आहे हे बघून आपल्याला कळतं. ते समजून घेतल्यानंतर मी जरा सैल झाले. आता मी अंधाधुन पुन्हा पाहते तेव्हा मला वाटतं की, राधिकासोबतचा आयुषमानचा जो सीन आहे तो थोडा लांबवायला हरकत नाही.
इंडस्ट्री अशी आहे. ताहिराने या उत्तराने खरंतर तमाम नायकांच्या सुविद्य पत्नी कशा विचार करत असतील तेच दाखवून दिलं आहे. त्यामुळे नायकांचं करिअर काहीसं सुकर होत असेल यात शंका नाही. आता ताहिराच्या या कमेंटवर आयुषमानचं म्हणणं काय आहे ते अद्याप समोर आलेलं नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)