Dream Proposal : 'आय लव्ह यू कतरिना...', विकी कौशलने केलं कतरिनाला भन्नाट पद्धतीने प्रपोज
Dream Proposal : विकीने कतरिनाला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते.
Katrina Kaif And Vicky kaushal : बॉलिवूडमध्ये सध्या विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफच्या (Katrina Kaif) लग्नाची चर्चा सुरू आहे. दोघांच्या लग्नाला अवघे काही दिवस उरले आहेत. विकी आणि कतरिनाचा लग्नसोहळा हटके असणार आहे. विकी कौशलने कतरिना कैफलादेखील अशाच हटके पद्धतीने प्रपोज केले होते.
विकीने कतरिनाला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले होते. त्याने सर्वात आधी कतरिना कैफचे आवडते डार्क ब्राउनी चॉकलेट बनवले, त्यानंतर ते पॅक करून तो कॅटच्या घरी पोहोचला आणि कॅटने तो बॉक्स उघडला तेव्हा त्यात एक गोंडस नोट आणि अंगठी होती, जे पाहून कतरिनाचा आनंद गगणात मावेनासा झाला होता.
विकीने ज्याप्रकारे कॅटला प्रपोज केले ते अनेक मुलींचे स्वप्न असते. विकीने कॅटला अशाप्रकारे प्रपोज केल्यानंतर अनेक मुलींच्या जोडीदाराकडून अपेक्षा वाढल्या असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जोडीदारासाठी 'ते' क्षण करा खास
तुमचा जोडीदार तुमच्यासाठी किती खास आहे आणि ज्या दिवशी तुम्ही त्याला तुमचा जीवनसाथी म्हणून निवडण्याचा विचार कराल त्या दिवशी तुम्ही तो क्षण कसा खास बनवू शकता हे समजून घेतले पाहिजे. कारण हा दिवस तुमच्यासाठी खास असणार आहे. लग्नासाठी प्रपोज केले म्हणून जोडीदार आयुष्यभर आनंदी असला पाहिजे.
शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज
मीडिया रिपोर्टनुसार, कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये होणाऱ्या शाही विवाह सोहळ्याआधी कोर्ट मॅरेज करणार असल्याचं बोललं जातंय. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. कतरिना आणि विकी शाही विवाह सोहळ्यासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार असल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या
Ankita Lokhande Wedding : लग्नपत्रिका झळकली! अंकिता-विकी 'या' ठिकाणी घेणार सात फेरे
Bigg Boss 15 : Salman Khan ने पुन्हा एकदा घेतली Karan Kundrra ची शाळा
Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha