(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss 15 : Salman Khan ने पुन्हा एकदा घेतली Karan Kundrra ची शाळा
Bigg Boss New Promo : 'बिग बॉस 15' मध्ये सलमान खान पुन्हा एकदा करण कुंद्राची शाळा घेताना दिसणार आहे.
Bigg Boss Latest Update : 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या वीकेंण्डच्या वारी सलमान खान (Salman Khan) पुन्हा एकदा करण कुंद्राची (Karan Kundra) शाळा घेताना दिसणार आहे. प्रतिक सहजपालसोबतच्या भांडणाच्या मुद्द्यावर सलमान करण कुंद्राला ओरडताना दिसणार आहे. बिग बॉस 15 च्या आगामी भागात खूप गोंधळ होणार आहे. स्पर्धकांना सलमान धडे देताना दिसणार आहे.
प्रतीक सहजपालसोबत करण कुंद्रा भांडल्याने सलमान खान करणची शाळा घेताना दिसणार आहे. सलमान व्हिडीओमध्ये करण कुंद्राला म्हणतो आहे,"जेव्हा तुझ्याकडे शब्द नसतात तेव्हा तू हातपाय चालवत असतोस. तुला आजपर्यंत अनेकदा थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. मी बिग बॉसच्या घरात येतो, तुम्ही मला शिव्या देऊन दाखवा." यावर करण कुंद्रा स्पष्टीकरण देत म्हणतो,"त्याला इजा करण्याचा माझा हेतू नव्हता". त्यावर सलमान म्हणतो,"हे सर्व बकवास आहे".
View this post on Instagram
बिग बॉस 15 चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान शमिता शेट्टीवर नाराज झालेला दिसून येतो. या व्हिडिओमध्ये शमिता शेट्टी म्हणते आहे, अभिजीत तिला पायातली चप्पल म्हणाला. त्यामुळे सलमान खान रागावलेला आहे. येत्या भागात प्रेक्षकांना प्रचंड गोंधळ पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या
Pushpa: The Rise : 'पुष्पा: द राइज' सिनेमाचा टीझर आऊट
Mirzapur S2 : Konkona Sen Sharma ने आशियाई अकादमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2021 मध्ये मिळवला विजय
Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha