Kangana Ranaut : पंजाबमधील कार हल्ल्यानंतर कंगना मथुरेच्या मंदिरात नतमस्तक
Kangana Ranaut : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी कारवर हल्ला केल्याचा आरोप कंगना रणौतने काल केला होता. आज कंगना मथुरेत कृष्ण जन्मभूमीत पोहोचली आहे.
Kangana Ranaut : पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी कारवर हल्ला केल्याचा आरोप कंगना रणौतने (Kangana Ranaut) काल केला असून ती आज थेट कृष्ण जन्मभूमीत मथुरेत पोहोचली आहे. मथुरेतले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट फोटो शेअर करत लिहिले आहे, "दिल्ली ते मथुरा ड्रायव्हिंगचा अनुभव खूप आनंददायी होता. कृष्णजन्मभूमीच्या दर्शनासाठी आजचा दिवस खास आहे".
कंगनाने दर्शनासाठी गडद हिरव्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला आहे. मोत्याच्या दागिन्यांमुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत. मथुरेत पोहोचण्यासाठी कंगनाने दिल्ली ते मथुरा असा प्रवास केला आहे. कंगना रणौत काल हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप तिने काल केला होता.
View this post on Instagram
जमावाने घेरल्याचे व्हिडीओ कंगनाने शेअर केले होते. त्या व्हिडीओमध्ये कंगना म्हणाली होती,"पंजाबमध्ये पोहोचताच जमावाने माझ्या कारवर हल्ला केला आहे. हे लोक स्वतःला शेतकरी असल्याचे म्हणवून घेत आहेत. देशात सुरक्षा नसेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, तर हे खूप भयंकर आहे".
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. देशात आणि जगात घडणाऱ्या घडामोडींवर नेहमीच ती तिची मतं व्यक्त करत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगना यंदा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आली नसून कृष्णजन्मभूमीच्या दर्शनामुळे चर्चेत आली आहे.
कंगनाचे आगामी सिनेमे
'इमर्जन्सी', 'मणिकर्णिका रिटर्न्स: द लिजेंड ऑफ दिड्डा', 'तेजस', 'धाकड' आणि 'सीता: द इन्कारनेशन' हे कंगना रणौतचे आगामी सिनेमे आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha