Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवला रुग्णालयातून डिस्चार्ज; खास पोस्ट शेअर करत दिली माहिती
Siddharth Jadhav : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Siddharth Jadhav : मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल असून आता त्याला डिस्चार्ज मिळाला आहे. लाडक्या सिद्धूने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. सिद्धार्थ मागचा एक आठवडा आजारी असून रुग्णालयात दाखल होता.
सिद्धार्थने आता खास पोस्ट शेअर करत रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. या फोटोत सिद्धार्थच्या हातावर रुग्णालयातील स्टीकर लावलेला दिसत आहे. सिद्धार्थवर मुंबईच्या हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू होते. आता सिद्धार्थची प्रकृती सुधारली असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
सिद्धार्थने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"गेला आठवडाभर मी हिंदूजा रुग्णालयात दाखल होतो. आज घरी आलो आहे. हिंदूजा रुग्णालयातील स्टाफचे मनापासून आभार. रुग्णालयातील स्टाफने माझी मनापासून काळजी घेतली. अभिनव महाडीक दादा आणि त्यांची संपूर्ण टीम... एका फोनवर नेहमीच धावून येणार अमेय खोपकर दादा...शशांक नागवेकर दादा असचं प्रेम करत राहा."
View this post on Instagram
सिद्धार्थने पुढे लिहिलं आहे,"स्टार प्रवाह परिवार तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा होता आणि माझा भाऊ डॉ. लवेश जाधव जो रात्रभर जागून माझी काळजी घेत होता. मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं...त्यांना मनापासून धन्यवाद... आता हळूहळू बरा होतो आहे. खूप धावपळ असते आपली...पण त्यातही स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या".
सिद्धार्थ जाधवने मराठीसह बॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सिद्धार्थचे 'तमाशा लाईव्ह' आणि 'दे धक्का 2' हे सिनेमे नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'दे धक्का 2' या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकले. सिद्धार्थने या दोन्ही सिनेमांच्या प्रमोशन केले होते.
संबंधित बातम्या
Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; सहा दिवसांनंतरही प्रकृती नाजूक
Bipasha Basu Announce Pregnancy : लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणनं चाहत्यांना दिली गूड-न्यूज; शेअर केली खास पोस्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
