Deepika Padukone : प्रेग्नंट दीपिका पादुकोण रणवीर सिंहसोबत डिनर डेटवर; अभिनेत्रीच्या सासू-सासऱ्यांनी वेधलं लक्ष
Deepika Padukone Ranveer Singh Dinner Date : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच डिनर डेटला गेलेले दिसून आले आहेत. त्यावेळी जोडप्यासोबत त्यांचे आई-वडीलही दिसून आले.
Deepika Padukone Ranveer Singh Dinner Date : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आहे. दीपिका पादुकोणचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटो-व्हिडीओमध्ये अभिनेत्री बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. चाहतेही दीपिकाच्या लूकचं कौतुक करत आहेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) सध्या प्रेग्नंट दीपिका पादुकोणची काळजी घेत आहे. प्रेग्नंट दीपिका पादुकोण नुकतीच रणवीर सिंहसोबत डिनर डेटवर स्पॉट झाली आहे. याआधीही दीपिका अनेकदा आपल्या कुटुंबियांसमवेत डिनर डेटवर स्पॉट झाली आहे.
दीपिका-रणवीर डिनर डेटवर (Deepika Padukone Ranveer Singh Dinner Date)
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकतेच मुंबईतीच पंचतारांकित हॉटेलबाहेर स्पॉट झाले आहेत. बॉलिवूडचं लाडकं जोडपं आपल्या कुटुंबियासमवेत डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. दीपिका-रणवीरसोबत त्याचे आई-बाबादेखील दिसले होते. जोडप्याचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये व्हाइट शर्ट आणि डेनिममध्ये रणवीर कपूर रेस्टॉरंट बाहेर पडताना दिसून येत आहे. तर दीपिका त्याच्यामागून येत आहे. दीपिकाने चेसचं शर्ट परिधान केलं आहे. तसेच रणवीरने दीपिकाचा हात पडकडेला आहे. अभिनेता दीपिकाला व्यवस्थित घरी पोहोचवतो. त्यावेळी दीपिका-रणवीरसोबत त्यांचे आई-वडीलदेखील दिसून येत आहेत. दीपिका पादुकोण सध्या ब्रेकवर आहे. सध्या ती आपली प्रेग्नंसी लिव्ह एन्जॉय करताना दिसत आहे. कुटुंबियांसमवेत वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन ती आपलं डिनर एन्जॉय करत आहेत.
View this post on Instagram
दीपिका-रणवीरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमण कधी होणार?
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर दीपिका आणि रणवीरने आपली डेटिंग लाइफ एन्जॉय केली आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका आणि रणवीर आई-बाबा होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी दीपिका आणि रणवीरने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी सप्टेंबर महिन्यात छोच्या पाहुण्याचं आगमण होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे चाहत्यांना आता त्यांच्या बाळाची प्रतीक्षा आहे. दीपिकाचा 'फायटर' (Fighter) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता तिच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या