Deepika Padukone : अमिताभ, शाहरुख, ऐश्वर्या पडले मागे; 'Top 100' कलाकारांमध्ये दीपिका पादुकोण पहिल्या क्रमांकावर
Bollywood Celebrity IMDB Rating : आयएमडीबीने गेल्या दशकातील 'TOP 10' सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांना मागे सारत दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अव्वल ठरली आहे.
Deepika Padukone : आयएमडीबीने (IMDB) गेल्या दशकातील 'TOP 10' सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. यात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि ऐश्वर्या बच्चन (Aishwarya Rai Bachchan) यांना मागे सारत दीपिका पादुकोण (Deepika Padukone) अव्वल ठरली आहे. गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
दीपिका पादुकोण ठरली अव्वल!
शाहरुख खानसोबत ओम शांती ओममध्ये 2007 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली दीपिका पदुकोण IMDb वरील गेल्या 10 वर्षांमधील सर्वाधिक बघितली गेलेली भारतीय कलाकार ठरली आहे. चित्रपट उद्योगातील तिच्या जवळजवळ दोन दशके लांब अशा कारकिर्दीमध्ये तिने अनेक ब्लॉकबस्टर्समध्ये भूमिका केली आहे व त्यामध्ये कॉकटेल, ये जवानी है दीवानी, आणि पद्मावत व इतर भूमिकांचा समावेश आहे. तिने 2017 मध्ये हॉलीवूडमध्ये xXx: रिटर्न ऑफ एक्सेंडर केजसह पदार्पण केले व त्यामध्ये तिने व्हीन डिझेलसोबत झळकली.
“जगभरातील प्रेक्षकांच्या भावनांच्या आधारे बनवल्या गेलेल्या यादीमध्ये समावेश झाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे,” असं दीपिका पादुकोण म्हणाली. “IMDb हे कलाकार आणि चित्रपटप्रेमींसाठी विश्वसनीयतेचे प्रतीक आहे व त्यामध्ये लोकांच्या आवडीची खरी नस, त्यांची मते व त्यांचे प्राधान्यक्रम प्रतिबिंबित होतात. ही मान्यता मिळणे अतिशय अभिमानाची गोष्ट आहे व त्यामुळे मला श्रोत्यांकडून मिळालेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन अधिक काम करण्याची प्रेरणा देते.” आता ती कल्की 2898 एडी मध्ये दिसेल (जो 27 जून 2024 रोजी रिलीज होईल), आणि ह्या वर्षी तिचा सिंघम अगेनसुद्धा रिलीज होईल.
“अनेक वर्षांपासून मनोरंजनाचे चाहते त्यांच्या आवडत्या कलाकारांबद्दल अपडेटेड राहण्यासाठी IMDb चा आधार घेत आहेत. ही विशिष्ट यादी विश्वसनीय आकडेवारीवर आधारित आहे व गेल्या दशकाच्या अवधीमध्ये भारताच्या मनोरंजनाच्या जगामध्ये झालेल्या बदलांची दखल त्यामध्ये घेण्यात आली आहे,” असे IMDb इंडियाच्या प्रमुख यामिनी पतोडीया यांनी म्हटले.
IMDb वरील गेल्या दशकातील सर्वाधिक बघितले गेलेले भारतीय कलाकार
1. दीपिका पदुकोण
2. शाहरुख खान
3. ऐश्वर्या राय बच्चन
4. आलिया भट्ट
5. इरफान खान
6. आमिर खान
7. सुशांत सिंह राजपूत
8. सलमान खान
9. हृथिक रोशन
10. अक्षय कुमार
11. कतरिना कैफ
12. अमिताभ बच्चन
13. समंथा रूथ प्रभू
14. करीना कपूर
15. तृप्ती डीमरी
16. तमन्ना भाटिया
17. रणबीर कपूर
18. नयनतारा
19. रणवीर सिंह
20. अजय देवगण
संबंधित बातम्या