एक्स्प्लोर
दीपिकाच्या 'छपाक'चं चित्रीकरण पूर्ण, 2020 मध्ये प्रदर्शित होणार
'छपाक' शूटिंग मुख्यतः दिल्ली आणि मुंबईमध्ये झालं. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल.
मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोणने आपल्या आगामी 'छपाक' या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण केलं. दीपिकाने मंगळवारी इन्स्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. "आणि माझ्या करिअरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं," असं तिने लिहिलं आहे. हा चित्रपट अॅसिड हल्ल्यातील लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनावर आधारित आहे.
या पोस्टसह, दीपिकाने चित्रपटाच्या क्रू सदस्यांसोबतचा फोटोही शेअर केला आहे.
तर चित्रपटाबाबतच्या भावना व्यक्त करताना दीपिकाचा पती आणि अभिनेता रणवीर सिंह म्हणाला की, "या जादूचा साक्षीदार बनण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही." दीपिकाने यापूर्वी आपल्या भूमिकेविषयी म्हटले होते की, "ही एक अतिशय महत्त्वाची कथा आहे आणि ती सत्य घटनेवर आधारित आहे, म्हणून आशा आहे की त्यातून चांगल्या गोष्टी मिळतील." दीपिका पादुकोण या चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जोडली गेली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी दीपिका स्वत:ला रोखू शकली नाही, ती सेटवर रडत होती.View this post on Instagram
हा प्रोजेक्ट दीपिकासाठी चढ-उताराने भरलेला होता. शूटिंगच्या पहिल्या दिवशी चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत चर्चा करत असताना तिला रडू आवरलं नाही. मात्र त्यावेळी तिने भावनांवर मात करुन शूटिंगला सुरुवात केली. 'छपाक' शूटिंग मुख्यतः दिल्ली आणि मुंबईमध्ये झालं. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटात दीपिकासोबत विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement