एक्स्प्लोर
दीपिका पदुकोण-रणवीर सिंहचा 5 जानेवारीला साखरपुडा?
पाच जानेवारीला दीपिका तिचा 32 वा बर्थडेही श्रीलंकेतच साजरा करणार आहे. यानिमित्ताने रणवीर-दीपिका आपल्या नात्याला नवं नाव देण्याची शक्यता आहे.
मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीनंतर आणखी एक सेलिब्रेटी कपल विवाहबंधनात अडकणार आहे. 'पद्मावती' दीपिका पदुकोण आणि 'बाजीराव' रणवीर सिंह यांचा साखरपुडा होणार असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे दीपिकाच्या वाढदिवसाला, अर्थात पाच जानेवारीलाच दोघांची रिंग सेरेमनी होण्याची चिन्हं आहेत.
'गोलियोंकी रासलीला- राम-लीला' या चित्रपटातून रणवीर-दीपिका पहिल्यांदा ऑनस्क्रीन झळकले होते. त्यानंतर दोघांचं अफेअर असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये रंगली. त्यानंतर बाजीराव-मस्तानी, पद्मावती या चित्रपटांमध्ये दोघं एकत्र दिसले.
इतक्या वर्षांत दोघांनीही आपल्या रिलेशनशीपची कबुली दिली नव्हती. मात्र फिल्मफेअरच्या पार्टीत तिने रणवीरचा 'बॉयफ्रेण्ड' असा उल्लेख केल्याचं म्हटलं जातं.
दीपिका आणि रणवीर न्यू इयर सेलिब्रेशनसाठी श्रीलंकेत आहेत. पाच जानेवारीला दीपिका तिचा 32 वा बर्थडेही श्रीलंकेतच साजरा करणार आहे. यानिमित्ताने रणवीर-दीपिका आपल्या नात्याला नवं नाव देण्याची शक्यता आहे.
रणवीर-दीपिकाची मुख्य भूमिका असलेल्या पद्मावती चित्रपटाचं भवितव्य सध्या टांगणीला लागलं आहे. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या दोघंही चिंतेत असले, तरी पर्सनल लाईफमध्ये दोघं एन्जॉय करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement