एक्स्प्लोर
दबंग खानकडून 'बिईंग सलमान' गेम लाँच
नवी दिल्लीः बॉलिवूड स्टार सलमान खानने 'बिईंग सलमान' नावचा गेम लाँच केला आहे. सलमानने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना सरप्राईज देण्यार असल्याचं वचन दिलं होतं. चाहत्यांनाही त्याबद्दल चांगलीच उत्सुकता होती. अखेर सलमानने दिलेलं वचन पूर्ण केलं आहे.
सलमानने ट्विटरवरुन या गेमचा टीझरही शेअर केला आहे. या गेममध्ये सलमानचे तीन पात्र आहे. 'दबंग' सिनेमातील चुलबूल पांडे, 'एक था टायगर' सिनेमातील टायगर आणि प्रेम हे तीन पात्र या गेममध्ये आहेत.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/769801356542697472
दबंग चुलबूल पांडे, टायगर आणि प्रेम हे तिन्ही पात्र कसे साकारले आहेत, त्यांचं काय काम आहे, हे या गेममध्ये दाखवलं आहे. अन्याय, आतंकवाद आणि वाईट गोष्टींचा नाश करण्याचे तीन टास्क या गेममध्ये देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
नाशिक
करमणूक
पुणे
Advertisement