Happy Birthday Chitrangada Singh : मॉडेल, अभिनेत्री ते चित्रपट निर्माती... चित्रांगदा सिंहच्या सौंदर्याचे लाखो दिवाने! जाणून घ्या तिच्याबद्दलच्या खास गोष्टी...
Happy Birthday Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा आज 46वा वाढदिवस आहे. चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाचा जन्म 28 मार्च 1976 रोजी झाला.
Happy Birthday Chitrangada Singh : अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा आज 46वा वाढदिवस आहे. चित्रांगदा सिंह ही अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे. चित्रांगदाचा जन्म 28 मार्च 1976 रोजी झाला. तिने चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते. फार कमी लोकांना माहीत आहे की, चित्रांगदा एका मुलाची आई आहे.
मूळची राजस्थानमधील जोधपूरची चित्रांगदा सिंह सिनेमातील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. चित्रांगदा ही शीख जाट कुटुंबातील आहे. तिचे वडील निरंजन सिंग हे लष्करी अधिकारी असून आई गृहिणी आहे आणि भाऊ दिग्विजय सिंग गोल्फपटू आहे. तिला एक बहीण देखील आहे तिचे नाव टीना सिंह आहे. चित्रांगदाला एअर होस्टेस व्हायचं होतं. ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर चित्रांगदाने वेगवेगळ्या एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस पदासाठी अर्ज केला होता.
चित्रांगदाने 2005 साली 'हजारो ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगाही आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट घेतला.
फार कमी लोकांना हे माहित असेल की तिचे खरे नाव चित्रांगदा सिंह नसून चित्रांगदा सिंह चहल आहे. एका मुलाखतीत चित्रांगदाने खुलासा केला होता की, तिचे नाव महाभारतातील अर्जुनाच्या पत्नीच्या नावावरून 'चित्रांगदा' असे ठेवण्यात आले.
View this post on Instagram
चित्रांगदाने दिग्दर्शक सुधीर कुमार यांच्या 2003 मध्ये आलेल्या 'हजारों ख्वैशीं ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातील चित्रांगदाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर, 2005 मध्ये ती 'काल में' चित्रपटात झळकली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- RRR Box Office Collection : राजामौलींच्या 'आरआरआर' सिनेमाचा दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Oscars Awards 2022 : अँड द ऑस्कर गोज टू... लॉस एंजेलिसमध्ये रंगणार ऑस्कर सोहळा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha