Chhaava Film Promo :अथांग पाणी, धगधगतं समरांगण अन् घनघोर युद्ध; छावा चित्रपटाचा नवा प्रोमो समोर!
Chhaava Jal Promo : छावा या चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोत मोठा उद्धप्रसंग दाखवण्यात आला आहे. येत्या 14 फेब्रवारी रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे.

Chhaava - Jal Promo : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विकी कौशलच्या छावा या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होता आहे. या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे. त्यामुळेच या चित्रपटात नेमके काय असणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. असे असतानाच आता या चित्रपटाचा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोतील दृश्य पाहून चित्रपटात मोठे युद्धप्रसंग असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
छावा चित्रपटाचा नवा प्रोमो रिलीज
छावा हा बहुचर्चित चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटातील काही गीत प्रदर्शित केली आहेत. त्यानंतर आता प्रदर्शनासाठी अवघे सहा दिवस राहिलेले असताना या चित्रपटाचा एक नवा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोला 'जल प्रोमो' असे नाव देण्यात आले आहे.
चित्रपटात दाखवला जाणार मोठा युद्धप्रसंग
एकूण 37 सेकंदांचा हा प्रोमो आहे. या प्रोमोत विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या वेषभुषेत दिसत आहे. सोबतच रणांगणात मोठे युद्ध होताना दिसत आहे. विशेष म्हणजे विकी कौशलच्या हातात गदा, धनुष्यबाण अशी शस्त्रं दिसत आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदान्ना ही महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्याने रिलीज करण्यात आलेल्या या प्रोमोत रश्मिका मंदानादेखील दिसत आहे.
14 फेब्रुवारी रोजी देशभरात चित्रपट होणार प्रदर्शित
विशेष म्हणजे रिलीज करण्यात आलेल्या जल प्रोमोनुसार छावा चित्रपटात पाण्यामधील युद्ध प्रसंगही आहे. त्याची एक झलक या प्रोमोत दाखवण्यात आली आहे. येत्या 14 फेब्रवारी रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आहे.
ट्रेलर आल्यानंतर झाला होता वाद
दरम्यान, या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र साकारता यावे यासाठी विकी कौशलने स्वत:वर बरीच मेहनत केलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो यावर काम करत होता. या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही आक्षेपही घेण्यात आले होते. त्यानंतर वाद नको म्हणून चित्रपटाच्या दिग्दर्शकाने वादग्रस्त सिन हटवण्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा :
OTT Release This Week : वीकेंडला मनोरंजनाचा धमाका, 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज पाहायला विसरु नका
ब्रेकिंग! सलमान खान धमकी प्रकरणातील दोघांना जामीन, आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
