एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘पद्मावती’च्या मीडिया स्क्रीनिंगवरुन सेन्सॉर बोर्ड नाराज
सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यापूर्वीच दोन न्यूज चॅनेलच्या संपादकांसाठी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्याने बोर्डाने यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली : 'पद्मावती' सिनेमावरुन सुरु असलेला वाद थांबण्याचं नाव घेत नाही आहे. कारण, कालच तांत्रिक गोष्टींचा हवाला देत सेन्सॉर बोर्डाने 'पद्मावती' सिनेमाची कॉपी परत पाठवल्याची बातमी ताजी होती. त्यातच आता सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यापूर्वीच दोन न्यूज चॅनेलच्या संपादकांसाठी स्पेशल स्क्रीनिंग आयोजित केल्याने बोर्डाने यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
" सिनेमा सेन्सॉर बोर्डाला दाखवण्यापूर्वीच, तसेच त्याला सीबीएफसीकडून प्रमाणपत्र मिळण्यापूर्वीच मीडियासाठी सिनेमाचं स्क्रीनिंग होणं, अतिशय दुर्दैवी आहे. सध्या राष्ट्रीय न्यूज चॅनेलमधून सिनेमाची समीक्षा होत आहे." अशी प्रतिक्रिया सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींनी दिली आहे.
सेन्सॉर बोर्डाने ‘पद्मावती’ सिनेमाची कॉपी परत पाठवली
'पद्मावती' सिनेमा पाहिल्यानंतर सोशल मीडियातून सिनेमावर आपली मतं व्यक्त होत आहेत. त्यावरुनच प्रसून जोशींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सेन्सॉर बोर्डाकडून सिनेमाची समीक्षा होण्यापूर्वीच, इतरांसाठी स्क्रीनिंग करणं, अतिशय चुकीचं असल्याचं मतही प्रसून जोशींनी व्यक्त केलं.
‘पद्मावती’चं तिकीट काढण्याआधी विमा काढून ठेवा, फेसबुकवरुन धमकी
दरम्यान, पद्मावतीच्या मीडिया स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर बोर्डाची तीव्र नाराजी पाहता, सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
पद्मावती सिनेमाचं सेन्सॉर बोर्डाने पाहण्यापूर्वीच एनडीटीव्हीचे पत्रकार रजत शर्मा आणि रिपब्लिक टीव्हीचे अरणब गोस्वामी यांच्यासाठी स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं. हा सिनेमा पाहिल्यानंतर रजत शर्मा यांनी या सिनेमात काहीही आक्षेपार्ह नसल्याचं सांगितलं होतं.
‘पद्मावती’ला कोणीही रोखू शकणार नाही: दीपिका पादूकोण
तर रिपब्लिक टीव्हीचे अरणब गोस्वामी यांनी सांगितलं की, "या सिनेमात राजपूत समाजा विरोधात काहीही नाही. ज्यातून कुणाच्या भावना दुखावतील. वास्तविक, ही तर एकप्रकारे त्यांना (पद्मावती) दिलेली श्रद्धांजली आहे."
संबंधित बातम्या
…तर दीपिका पादूकोणचं नाक कापू : करणी सेना
पद्मावती’ वाद : संपूर्ण बॉलिवूड भन्साळींच्या समर्थनार्थ मैदानात
‘पद्मावती’पेक्षा राजस्थानातील महिलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या : शशी थरुर
एक दिल.. एक जान.. ‘पद्मावती’तील प्रेम-विरह गीत रीलिज
‘पद्मावती’चा विरोध तीव्र, भन्साळींच्या घरासमोर आंदोलन
‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
दीपिकाचा जबरदस्त लूक, ‘पद्मावती’चं नवं पोस्टर रिलीज
रणवीरच्या खिल्जीमुळे दीपिका अस्वस्थ, ब्रेकअपची चर्चा
रिलीजआधी ‘पद्मावती’चा विक्रम; ‘बाहुबली’, ‘दंगल’ला मागे टाकलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement