(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brahmastra : आलिया-रणबीरच्या 'ब्रम्हास्त्र'चा प्रदर्शनाआधी असाही विक्रम; रचला इतिहास
Brahmastra : आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.
Brahmastra : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. अयान मुखर्जीच्या (Ayan Mukerji) बहुप्रतीक्षित 'ब्रम्हास्त्र' सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच एक विक्रम केला आहे. वॉल्ट डिस्ने स्टुडिओ पिक्चर्सच्या ग्लोबल रिलीज कॅलेंडरमध्ये स्थान मिळवणारा हा भारतातील पहिला सिनेमा ठरला आहे.
अयान मुखर्जीने 'ब्रम्हास्त्र' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. आलिया-रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), मौनी रॉय (Mouni Roy), अक्किनेनी नागार्जुन (Nagarjun Akkineni) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा सिनेमा 9 सप्टेंबर 2022 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमाची घोषणा ऑक्टोबर 2017 मध्ये झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू झाले. याआधी जून आणि नंतर सप्टेंबर 2019 मध्ये या सिनेमाचे शूटिंग वाराणसीमध्ये झाले होते. या सिनेमाद्वारे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
संबंधित बातम्या