(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Irrfan Khan | इरफान खानचा शेवटचा ऑडिओ मेसेज; चाहत्यांसाठी खास संदेश
बॉलिवूड अभिनेता इरफान खानचं निधन झालं असून तो 54 वर्षांचा होता. 'न्यूरोएन्डोक्राईन ट्यूमर' या आजाराशी झुंज देत असतानाही इरफानने आपला शेवटचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम'चं शुटींग पूर्ण केलं. त्यावेळी प्रमोशनदरम्यान फॅन्ससाठी त्याने एक ऑडिओ मेसेज जारी केला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून गंभीर आजाराशी झुंज देत होता. आजारी असतानाही त्यांने आपला शेवटचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम'चं शुटींग पूर्ण केलं होतं. परंतु, आजारामुळे आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करणं इरफानला शक्य झालं नाही. परंतु, त्याने आपल्या फॅन्ससाठी एक ऑडिओ मेसेज जारी केला होता. आपल्या या शेवटच्या ऑडिओ मेसेजमध्ये इरफानने फॅन्सना एक संदेश दिला होता. इरफान म्हणाला की, 'खरचं जेव्हा आयुष्य तुमच्या हातात लिंबु देतं ना, त्यावेळी त्याचं सरबत करणं अत्यंत अवघड होऊन जातं. या परिस्थितीत मी लिंबाचा सरबत करू शकतो की, नाही ते तुमच्या हातात आहे.'
इरफान खानचा शेवटचा ऑडिओ मेसेज :
'नमस्कार, मित्रांनो. मी आहे इरफान. मी आज तुमच्यासोबत आहेही आणि नाहीही. चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' फार खास आहे. खरं सांगायचं झालं तर माझी मनापासून इच्छा होती की, हा चित्रपट तेवढ्याच प्रेमाने प्रमोट करावा, जेवढ्या प्रेमाने आम्ही हा तयार केला आहे. परंतु, माझ्या शरीरामध्ये काही unwanted पाहुणे बसले आहेत. त्यांच्याशी सध्या चर्चा सुरू आहे. पाहुयात यातून काय साध्या होतंय. जे काही असेल त्यासंदर्भात तुम्हाला माहिती देण्यात येईल.'
पाहा व्हिडीओ : विविध क्षेत्रातील मंडळींनी इरफान खान यांना वाहिली श्रद्धांजली
'एक म्हण आहे... When life gives you lemons, you make lemon immediately.बोलायला चांगलं वाटतं, परंतु, खरचं जेव्हा आयुष्य तुमच्या हातात लिंबू देतं, त्यावेळी त्याचं सरबत तयार करणं अवघड असतं. परंतु, पॉझिटिव्ह राहण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो. सध्याच्या परिस्थितीत लिंबाचं सरबत तयार करू शकेल की, नाही. हे तुमच्या हातात आहे.'
'हा चित्रपटा आम्ही सर्वांनी त्यांच पॉझिटिव्हीटीने तयार केला आहे, मला माहिती आहे, हा चित्रपटा तुम्हाला नवीन गोष्टी शिकवेल, तुम्हाला हसवेल, रडवेल आणि पुन्हा एकदा हसवेल कदाचित.'
दरम्यान, इरफान खानचा चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये रिलीज झाली आहे. अशातच कोरोनामुळे देशभरातील चित्रपटगृह बंद करण्यात आली. त्यानंतर हा चित्रपट डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला. होमी अदजानिया द्वारा निर्मित 'अंग्रेजी मीडियम' या चित्रपटात वडिल आणि मुलीचं अनोखं नातं सादर केलं आहे. चित्रपटात इरफान खानने वडिलांची भूमिका साकारली आहे. यामध्ये इरफान खानसोबत डिंम्पल कपाडीया आणि करिना कपूरही आहे.
संबंधित बातम्या :
Irrfan Khan | प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचं निधन
Irrfan Khan | मालिकांपासून सुरुवात करून थेट हॉलिवूड गाठणारा 'पान सिंह तोमर' काळाच्या पडद्याआड