एक्स्प्लोर

Elnaaz Norouzi Happy On Ayatollah Khomeini Death: खामेनींच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेनासा; VIDEO शेअर करत म्हणाली, 'देव खूप महान...'

Elnaaz Norouzi Happy On Ayatollah Khomeini Death: जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' सिनेमात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीनं खामेनी यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केलाय. अभिनेत्रीनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Elnaaz Norouzi Happy On Ayatollah Khomeini Death: इराणवरील इस्रायली-अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Hosseini Khamenei) ठार झाल्याची बातमी आली आणि सगळीकडे वाऱ्यासरखी पसरली. या बातमीनं संपूर्ण जग हादरलं, सगळीकडे गोंधळ पसरला. अनेक ठिकाणी खामेनींच्या मृत्यूवर शोक व्यक्त करण्यात आला. दरम्यान, एका बॉलिवूड अभिनेत्रीनं (Bollywood Actress) मात्र, खामेनींच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केला आहे. तिनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत देवाचे आभार मानले आहेत.

जॉन अब्राहमसोबत 'तेहरान' सिनेमात दिसलेली बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजीनं खामेनी यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केलाय. अभिनेत्रीनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिनं खामेनींच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केलाय. महत्त्वाची बाब म्हणजे, एलनाज नौरोजी मूळची इराणची आहे. तिचा जन्म तेहरानमध्येच झालेला. तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि त्यानंतर अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये दिसलीय.  

खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये शोककळा पसरली आहे. तर, दुसरीकडे 'सेक्रेड गेम्स' फेम अभिनेत्रीनं आनंद व्यक्त केला आहे. तिनं एका वादग्रस्त आणि स्पष्ट वक्तव्यानं आपला आनंद व्यक्त केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Elnaaz Norouzi (@iamelnaaz)

खामेनींच्या मृत्यूवर अभिनेत्री एलनाज नौरोजी काय म्हणाली? (US Israel strikes on Iran)

बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी गेल्या कित्येक दिवसांपासून इराणमध्ये मानवाधिकार आणि स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत होती. अशातच खामेनींच्या मृत्यूची बातमी तिनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत 'धन्यवाद', असं लिहिलंय. तिनं एका व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटलंय की, ती आणि सर्व इराणी 47 वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते. पुढे एलनाजनं लिहिलंय की, "देव खूप महान आहे, आम्हाला या बातमीवर विश्वास बसत नाहीय..."                                     

व्हिडीओमध्ये बोलताना अभिनेत्री एलनाज नौरोजी म्हणाली की, "आपण एका हुकूमशहाच्या मृत्यूचा आनंद साजरा करत आहोत. खामेनी गेले आहेत." त्यासोबत तिनं टाळ्या आणि हार्ट इमोजी शेअर केलेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actor Ajith Kumar Stranded In Dubai: इस्रायल-अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात दिग्गज अभिनेता दुबईत अडकला; सुरक्षेबाबत मॅनेजरचं मोठं विधान!

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood Actress Death: बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
बॉलिवूड अभिनेत्रीचं झोपेतच निधन, महिनाभरानंतर कुटुंबाने दिली माहिती; इन्स्टाग्रामची शेवटची पोस्ट चर्चेत, नेमकं काय लिहिलं?
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
'तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं..' ज्योती चांदेकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनी तेजस्विनी पंडितची भावूक पोस्ट; म्हणाली ' आय ॲम सॉरी ...'
Sunny Deol Reaction Pan Masala Gutkha Ads: पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
पान मसाल्याची जाहिरात करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी तुकाराम मुंढेंच्या रडारवर; सनी देओल म्हणाला, 'पैशांसाठी इमान विकणार...'
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget