एक्स्प्लोर
तिहेरी तलाक निर्णयाचं बॉलिवूड सेलिब्रिटींकडून स्वागत
तिहेरी तलाक निर्णयाचं बॉलिवूड सेलिब्रिटींनीही स्वागत केलं आहे. मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणास यामुळे चालना मिळेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : तिहेरी तलाक घटनाबाह्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयाचं देशभरात स्वागत करण्यात आलं. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही या निर्णयाबाबत ट्विटरवरुन आपलं मत व्यक्त केलं.
या निर्णयामुळे मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणा एक नवा अध्याय सुरु होईल असं मत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी व्यक्त केलं आहे. या निर्णयाचं स्वागत करत अनेक सेलिब्रिटींनी ट्विटही केलं आहे.
याबाबत मत व्यक्त करताना अभिनेत्री दिया मिर्झा म्हणाली की, 'लोकशाहीचा विजय, देशातील महिलांच्या अधिकारासाठीचा ऐतिहासिक दिवस.'
तर याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनीही याबाबत आपलं मत मांडलं. 'काही निर्णय हे पप्पू किंवा भक्तांसाठी नसतात. तीन तलाक निर्णय हा महिलांच्या सशक्तीकरणाचा विजय आहे.' दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे. 'तिहेरी तलाकवरील निर्णयाचं स्वागत आहे. मुस्लिम महिलांच्या सशक्तीकरणाचा नवा अध्याय सुरु झाला आहे.'कुछ फ़ैसले ना तो libtards के लिए होते है, ना पप्पुओ के लिए, ना भक्तों के लिए। #TripleTalaq का फ़ैसला महिलाओं के मानवाधिकार की जीत है।बस।????????
— Anupam Kher (@AnupamPkher) August 22, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement