एक्स्प्लोर
करणसिंग तिसऱ्यांदा बोहल्यावर, बिपाशाच्या लग्नाचा मुहूर्त ठरला
मुंबई : बॉलिवूडची बंगाली ब्यूटी बिपाशा बसू आणि तिचा अभिनेता करण सिंग ग्रोव्हर येत्या 30 एप्रिल रोजी विवाहंबधनात अडकणार आहेत. जवळचे नातेवाईक आणि मोजक्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडणार आहे. खुद्द बिपाशा बसूनेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.
'30 एप्रिल हा आम्हा सर्वांसाठी मोठा दिवस आहे. आतापर्यंत दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी कुटुंबीय, मित्र परिवार, चाहते आणि हितचिंतक या सर्वांचे आभार. लग्नसोहळा हा खाजगी कार्यक्रम असून आमच्या प्रायव्हसीचा आदर राखल्याबद्दल धन्यवाद. आमच्या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद असू द्या.' असं बिपाशाने स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.
बिपाशाच्या स्टेटमेंटपूर्वी अभिनेत्री प्रियंका चोप्रने ट्वीट करुन मैत्रिणीच्या लग्नाचा आनंद व्यक्त केला होता.
https://twitter.com/priyankachopra/status/717941609812398080
मुंबईच्या उपनगरातील एका हॉटेलची लग्नासाठी निवड झाल्याचंही म्हटलं जातं. तर टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील मंडळींसाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे.
अलोन चित्रपटाच्या सेटवर करण आणि बिपाशाची भेट झाली होती. त्यानंतर दोघं अनेकदा पार्टी आणि हॉलिडेवर एकत्र जाताना दिसले.
बिपाशा बसूच्या पूर्वायुष्यामुळे करण सिंग ग्रोव्हरचे पालक लग्नासाठी राजी नव्हते, तर करणचं हे तिसरं लग्न असल्यामुळे बिपाशाचे कुटुंबीय लग्नाला तयार नव्हते. करणचं यापूर्वी श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेटशी लग्न झालं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement