Bhool Bhulaiyaa 2 On OTT: कार्तिक आर्यनचा सुपरहिट चित्रपट ‘भूल भुलैया 2’ ओटीटीवर रिलीज! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार...
Bhool Bhulaiyaa 2 On OTT: कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे.
Bhool Bhulaiyaa 2 On OTT: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) स्टारर 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 20 मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू आजही बॉक्स ऑफिसवर दिसत आहे. अजूनही चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या अभिनयाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. कियारा अडवाणीसोबतची त्याची ऑनस्क्रीन जोडी चाहत्यांना आवडली आहे.
दरम्यान, आता हा चित्रपट ओटीटीवरही आला आहे. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या हा चित्रपट बघण्याची संधी मिळणार आहे.
कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट?
कार्तिक आणि कियाराचा ‘भूल भुलैया 2’ OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज झाला आहे. याची माहिती खुद्द नेटफ्लिक्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. नेटफ्लिक्सने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यामध्ये कार्तिक, कियारा आणि तब्बू दिसत आहेत. यात कार्तिक आर्यन 'रूह बाबा' अवतारात दिसत आहेत. या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये 'भूल भुलैया 2' नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्याचे म्हटले आहे. आता हा चित्रपट प्रेक्षक घरबसल्या कधीही पाहू शकणार आहेत.
कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. आता हा चित्रपट नेटफ्लिक्सवर देखील रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सचे सदस्य हा चित्रपट सहज पाहू शकतात.
चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर दबदबा!
कार्तिक आणि कियारा यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा दुप्पट कामगिरी करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे बहुतांश शो अजूनही हाऊसफुल्ल जात आहेत. कार्तिक आणि कियारादेखील त्यांच्या चित्रपटाच्या यशामुळे खूप खुश आहेत.
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. ‘भूल भुलैया’ चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या बालन आणि शायनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. ‘भूल भुलैया 2’मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
संबंधित बातम्या