Bholaa Movie Teaser: 'एक चट्टान और सौ शैतान...'; अंगावर शहारे आणणारा अजयच्या 'भोला' चा टीझर रिलीज
भोला (Bholaa) या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
Bholaa Movie Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या अजयच्या दृश्यम-2 या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता त्याच्या भोला (Bholaa) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
गेल्या वर्षी 22 नोव्हेंबरला अजयच्या भोला चित्रपटाचा पहिला टीझर रिलीज झाला होता. त्यानंतर भोला चित्रपटाचा दुसरा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजयनं त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भोला चित्रपटाचा दुसरा टीझर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री तब्बू देखील दिसत आहे. भोला चित्रपटाच्या या दुसऱ्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'भोला' हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पाहा टीझर
View this post on Instagram
भोला या चित्रपटाची अजयचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाचं अजयने दिग्दर्शन देखील केले आहे. अजय देवगणचा 'भोला' हा साऊथ सिनेमाचा सुपरहिट सिनेमा 'कैथी'चा रिमेक आहे.
भोला हा चित्रपट 3D मध्ये देखील रिलीज होणार आहे, असं म्हटलं जात आहे. 'भोला' या चित्रपटामध्ये अजय आणि तब्बू स्क्रिन शेअर करणार आहेत. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अजय आणि तब्बूची जोडी 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसून आली होती. आता तब्बू आणि अजय यांच्या जोडीला पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अजयच्या चित्रपटांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
अजयच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. त्याच्या काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या दृष्यम-2 या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याच्या 'रनवे 34' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटात अजयसोबतच अमिताभ बच्चन यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. गोलमाल-5, सिंघम, थँक गॉड यांसारख्या चित्रपटांमधून अजय प्रेक्षकांच्या भेटीस आला.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bholaa Teaser : अॅक्शन, ट्विस्ट, रहस्य, थरार अन् नाट्य; अजय देवगणच्या 'भोला'चा टीझर आऊट