एक्स्प्लोर

Bholaa Teaser : अॅक्शन, ट्विस्ट, रहस्य, थरार अन् नाट्य; अजय देवगणच्या 'भोला'चा टीझर आऊट

Bholaa : सुपरस्टार अजय देवगणच्या आगामी 'भोला' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे.

Ajay Devgn Blolaa Teaser Out : हिंदी सिनेसृष्टीत सध्या बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) बोलबाला आहे. एकीकडे अक्षयचा 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घातलो आहे. दुसरीकडे त्याच्या आगामी 'भोला' (Bholaa) या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या टीझरचे वैशिष्ट्य म्हणजे हा टीझर खास 3 डीमध्ये रिलीज करण्यात आला आहे. 

'भोला' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. 'भोला' हा सिनेमा ज्योती नामक एका लहान मुलीवर बेतलेला आहे याचा टीझरवरुन अंदाज येतो. टीझरमध्ये अजय देवगण तुरुंगात बसून गीता वाचताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

'भोला' हा रहस्यमय सिनेमा असून या सिनेमात प्रेक्षकांना थरार-नाट्य पाहायला मिळणार आहे. अॅक्शनचा तडका असलेल्या या सिनेमात अजय देवगणचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आता अजयला पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

अजय देवगण दिग्दर्शकाच्या भूमिकेत!

अजयच्या 'भोला'चा टीझर आऊट झाल्याने चाहते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अद्याप या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्टनुसार, हा सिनेमा पुढल्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. 'भोला' हा दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा हिंदी रिमेक आहे. तसेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगण सांभाळत आहे. 

'भोला' या सिनेमात अजय बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबत दिसणार आहे. या सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी अजय आणि तब्बूची जोडी 'दे दे प्यार दे' या सिनेमात दिसून आली होती. तर अजय देवगण, टी-सीरिज फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरिअर पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत.

अजयने भोला सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"कोण आहे तो...ज्याला स्वत:लाच माहित नाही तो हरवला आहे". या टीझरवर अजय देवगण पुन्हा एकदा अॅक्शनमोडमध्ये, 'भोला' ब्लॉकबस्टर होणार अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर 'भोला'चा टीझर व्हायरल होत आहे. 

संबंधित बातम्या

Bholaa : अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा बनवणार हिंदी रिमेक

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Dixit: डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
डोक्यावर ग्लास अन् बॉबी देओलच्या गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित; VIDEO पाहून चाहते घायाळ, अभिनेत्रीच्या सौंदर्यावर म्हणाले...
Ashok Saraf Dada Kondke: अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
अशोक सराफ यांनी सांगितला दादा कोंडकेंसोबतचा खास किस्सा! म्हणाले, 'या सिनेमानंतर त्यांनीच मला घेतलं नाही...'
Yash in Ramayan: रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
रावणाच्या भूमिकेत यश, पण आवाज आहे मराठी अभिनेत्याचा! 'या' कलाकाराच्या दमदार आवाजात झाली डबिंग, कोण आहे तो?
Salman Khans Maatrubhumi: सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?
सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज; आता फक्त '11' रुपयात पाहता येणार ‘हा’ सिनेमा, पण कुणासाठी आहे खास ऑफर?

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Bank News: अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
अध्यक्षपदाचा तिढा वरिष्ठांना त्रास न देता स्थानिक पातळीवरच सोडवा; शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंना टोला, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाबाबत नेमकं काय म्हणाले?
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
'ED 'सुपर कॉप' नाही, कायद्याच्या चौकटीत राहूनच काम केलं पाहिजे..' हायकोर्टानं मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई रद्द करत थेट फटकारलं
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
मुख्यमंत्र्यांनी गोकुळमध्ये पोरकटपणा करायची गरज नव्हती, लोकशाहीने महायुतीचा पराभव, राजू शेट्टींचा हल्लाबोल  
Meenakshi Shinde and Eknath Shinde: मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
मिनाक्षी शिंदे पक्षात एकाकी पडल्या, ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाकडे एकनाथ शिंदेंची पाठ, शिवसेनेचा एकही नेता फिरकला नाही
Praful Patel Meet Sharad Pawar: ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये तातडीची भेट, त्यादिवशी शरद पवारांशी काय बोलणं झालं? प्रफुल पटेलांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...
IND vs PAK U19 Asia Cup 2026 : 42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
42/4 वरून भारताला सावरलं, पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं; 80 चेंडूंत शतक ठोकणारा अर्जुन राजपूत आहे तरी कोण?
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
ऊसाला 3500 भाव द्या, अन्यथा 1 लाख शेतकऱ्यांचा धडक मोर्चा, शेट्टींचा सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांना  इशारा 
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
जास्त काळ भाजपसोबत राहू नका, रोहित पवारांची एकनाथ शिंदेंना विनंती, म्हणाले सरकारचं  डोकं सटकलंय
Embed widget