Bholaa : अजय देवगण पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत; दाक्षिणात्य सिनेमा 'कॅथी'चा बनवणार हिंदी रिमेक
Ajay Devgn : अजय देवगणने नुकतीच त्याच्या आगामी 'भोला' सिनेमाची घोषणा केली आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात झाली आहे.
Ajay Devgn And Tabu Film Bholaa : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'रनवे 34' (Runway 34) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) मुख्य भूमिकेत आहे. अजयचा आगामी 'भोला' (Bholaa) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कॅथी' (Kaithi) या दाक्षिणात्य सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. या सिनेमात अजय भोला हे पात्र साकारण्यासोबतच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.
अजय देवगणसाठी 'भोला' हा सिनेमा खूपच खास आहे. या सिनेमाच्या माध्यमातून अजय आणि तब्बूची जोडी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आता या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अजयने सोशल मीडियावर शूटिंगदरम्यानचा फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. फोटो शेअर करत अजयने लिहिले आहे,"आता अॅक्शन म्हणायची वेळ आली आहे. 'भोला' सिनेमा 30 मार्च 2023 रोजी रिलीज होणार आहे."
View this post on Instagram
'भोला' हा भावनिक सिनेमा आहे. या सिनेमात अजय देवगण आणि तब्बू मुख्य भूमिकेत आहे. अजय आणि तब्बूची जोडी 90 च्या दशकातील प्रेक्षकांची आवडती जोडी होती. दोघांनी अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. 'दे दे प्यार दे' या सिनेमात अजय आणि तब्बू शेवटचे एकत्र दिसले होते.
30 मार्च 2023 रोजी सिनेमा होणार प्रदर्शित
'भोला' सिनेमात तब्बू एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अजय देवगण, टी-सीरिज फिल्म्स, रिलायंस एंटरटेनमेंट आणि ड्रीम वॉरिअर पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 11 जानेवारी 2022 रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार होता. पण काही कारणांमुळे या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 30 मार्च 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या