Brahmastra Teaser : एका चुकीमुळे आयन मुखर्जीला पुन्हा एकदा पोस्ट करावा लागला ‘ब्रह्मास्त्र’चा टीझर, पाहा नेमकं काय झालं...
Brahmastra Teaser : 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra) पहिला टीझर ऑनलाईन रिलीज झाल्यानंतर जवळपास चार दिवसांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोशल मीडियावर आणखी एक टीझर शेअर केला आहे.
Brahmastra Teaser : 'ब्रह्मास्त्र'चा (Brahmastra) पहिला टीझर ऑनलाईन रिलीज झाल्यानंतर जवळपास चार दिवसांनी दिग्दर्शक अयान मुखर्जीने (Ayan Mukerji ) सोशल मीडियावर आणखी एक टीझर शेअर केला आहे. नवीन टीझर आधीच्या टीझरसारखा दिसत असला, तरी त्यात एक छोटासा बदल करण्यात आला आहे, जो शेवटी चाहत्यांच्या लक्षात आला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिय भट्ट (Alia Bhatt) मुख्य भूमिकेत असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या टीझरमध्ये पहिला चाहत्यांना एक जबरदस्त नजारा पाहायला मिळतो. सुरुवातीला यातील सर्व प्रमुख पात्रांबद्दल सांगण्यात आले आहे. हा टीझर 30 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या मुख्य जोडीची नावे प्रथम दिसत होती. त्यानंतर सहाय्यक कलाकारांमध्ये अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांची नावे दिसत होती.
नेमका बदल काय?
मात्र, नवीन टीझरमध्ये या सीक्वेन्समध्ये बदल करण्यात आला आहे. आता रणबीर आणि आलिया यांच्या आधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे नाव समोर येते. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर नागार्जुन आणि मौनीची नावे दिसत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये झालेल्या बदलावर चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने लिहिले, 'बच्चन सरांना आदर द्यायचाच होता.' दुसऱ्या एकाने लिहिले की, 'अयान अमितजी यांचे नाव प्रथम ठेवल्याबद्दल धन्यवाद.'
'ब्रह्मास्त्र' 9 सप्टेंबरला रिलीज होणार!
'ब्रह्मास्त्र' हा तीन भागांचा फँटसी चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर ‘शिवा’च्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, आलिया भट्ट ‘ईशा’च्या भूमिकेत आहे, जी त्याची मैत्रीण आहे. अमिताभ बच्चन हे प्रोफेसर ‘अरविंद चतुर्वेदी’ आहेत आणि नागार्जुन पुरातत्वशास्त्रज्ञ झाले आहेत, त्यांचे नाव ‘अजय वशिष्ठ’ आहे. मौनीच्या पात्राचे नाव ‘दमयंती’ आहे. हा चित्रपट 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
अयान आणि त्याच्या टीमने 'ब्रह्मास्त्र' बनवण्यात अर्ध्या दशकाहून अधिक वेळ घालवला आहे. एका इव्हेंटमध्ये अयान म्हणाला होता की, 'अनेक वर्षांपासून मला वाटत होते की, हा चित्रपट कधीच बनणार नाही आणि मी 'ब्रह्मास्त्र' बनवूनच मरेन. अनेकांनी मला विचारले होते की, चित्रपट इतका वेळ का घेत आहे आणि इतका महाग का आहे?’
हेही वाचा :
PHOTO : सिल्व्हर सिक्वेंस साडीत अनन्या पांडेचा कातीलाना अंदाज! पाहा फोटो...