Samrat Prithviraj Box Office Collection Day 2 : अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला बॉक्स ऑफिसवर मिळतेय पसंती, दुसऱ्या दिवशीच्या कमाईत वाढ!
Samrat Prithviraj : . चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 10.5 कोटींची कमाई केली आहे.
Samrat Prithviraj : बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay Kumar), मानुषी छिल्लर (Manushi Chhillar), संजय दत्त (Sanjay Dutt) आणि सोनू सूद (Sonu Sood) अभिनीत ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा चित्रपट 3 जून 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप आशा आहेत. त्याने आणि संपूर्ण टीमने चित्रपटाच्या प्रमोशनवर खूप मेहनत घेतली आहे. डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 10.5 कोटींची कमाई केली आहे. मात्र, ही कमाई त्याच्या ‘बच्चन पांडे’च्या तुलनेत कमी आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये वाढ झालेली आहे.
‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 12.5 -12.80 कोटींचा गल्ला जमवला असू शकतो, असा अंदाज बांधण्यात येत आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत 20 टक्के वाढ असू शकते. हा चित्रपट जगभरात 5000 स्क्रीन्समध्ये रिलीज झाला. तर, भारतात 3750 स्क्रीन्सवर रिलीज झाला. अक्षय कुमारच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बच्चन पांडे' या चित्रपटाला 'द काश्मीर फाईल्स'ने टक्कर दिली होती. पण, तरीही 'बच्चन पांडे'ने बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 12.5 कोटींची कमाई केली होती. मात्र, यावेळी अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' मागील चित्रपटाचा रेकॉर्डही मोडू शकला नाही.
'सम्राट पृथ्वीराज'कडून खूप अपेक्षा
अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज' बद्दल खूप अपेक्षा आहेत. अक्षय कुमारपासून ते संपूर्ण टीम या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करत आहे. उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. अशा स्थितीत 'सम्राट पृथ्वीराज' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
‘विक्रम’, ‘मेजर’सोबत स्पर्धा
अभिनेता कमल हासनचा 'विक्रम' देखील 'सम्राट पृथ्वीराज'सोबत 3 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'विक्रम'ची दक्षिणेत खूप क्रेझ आहे. 'विक्रम'ने पहिल्या दिवशी 34 कोटींची कमाई केली असून, काही दिवसांत तो 100 कोटींची कमाई करेल, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, आदिवी शेषच्या 'मेजर'नेही बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटांमुळे 'सम्राट पृथ्वीराज'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या