एक्स्प्लोर
अनुष्का शर्माच्या 'परी'चा झोप उडवणारा टीझर
परी हा चित्रपट येत्या होळीला म्हणजे 2 मार्च 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुंबई : लग्नानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माचा पहिला सिनेमा 'परी'चा टीझर रिलीज झाला आहे. 'परी- नॉट अ फेरीटेल'मधून अनुष्का प्रेक्षकांना घाबरवण्याच्या तयारीत आहे.
अनुष्कासोबत या सिनेमात परंब्रता चॅटर्जी, रिताभरी चक्रबर्ती, रजत कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. अनुष्काने घरातून बाहेर पडावं, यासाठी परंब्रताची धडपड टीझरमध्ये दिसते.
परी हा चित्रपट येत्या होळीला म्हणजे 2 मार्च 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा आधी 9 फेब्रुवारीला रिलीज होणार होता, मात्र अक्षयकुमारच्या पॅडमॅनसाठी याची तारीख बदलण्यात आली. पॅडमॅन आणि परी या दोन्ही चित्रपटांचे सहनिर्माते क्रिअर्ज एन्टरटेनमेंटच आहेत.
प्रोषित रॉयने 'परी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून अनुष्का शर्मानेच याची निर्मिती केली आहे. एन10, फिलौरीनंतर अनुष्काचं प्रॉडक्शन असलेला तिसरा चित्रपट आहे. परीचा टीझर पाहताना उर्मिला मातोंडकरची मुख्य भूमिका असलेल्या राम गोपाल वर्माच्या 'भूत' सिनेमाची आठवण होते.
आनंद एल राय यांच्या 'झिरो' सिनेमात शाहरुख खान, कतरिना कैफसोबत अनुष्का झळकणार आहे. तर वरुण धवनसोबत 'सुई धागा' चित्रपटातही अनुष्काची मुख्य भूमिका आहे.
पाहा टीझर :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement