एक्स्प्लोर
Advertisement
मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप
मुंबई : करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल मुश्किल’चं समर्थन करत बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला आहे. पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधान मोदींनी देशवासीयांची माफी मागावी, असे ट्वीट अनुरागने आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन केलं आहे.
“पाक दौऱ्याबाबत मोदींनी माफी मागावी”
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबरच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी मागायला हवी. कारण यादरम्यानच दिग्दर्शक-निर्माता करण जोहर ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाची शूटिंग करत होता.”, असे अनुराग कश्यपने म्हटले आहे.
“तुमचा दौरा आम्ही दिलेल्या करातूनच होतो. आम्ही जो सिनेमा बनवतो, त्यावरचं करही देतो.”, असेही अनुरागने पंतप्रधानांना उद्देशून म्हटलं आहे.
‘ऐ दिल है मुश्किल’चा वाद काय आहे?
‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडलं. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. आता तर सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
अनुरागचे ट्वीट :
https://twitter.com/anuragkashyap72/status/787262926944137216
https://twitter.com/anuragkashyap72/status/787592118206423041
https://twitter.com/anuragkashyap72/status/787592321424560128
https://twitter.com/anuragkashyap72/status/787592719950614528
https://twitter.com/anuragkashyap72/status/787593263742156800
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement