VIDEO: पॅरिसमधील कार्यक्रमासाठी अनन्यानं केलेल्या लूकची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली; म्हणाले, 'दीदी, ही मच्छरदाणी...'
अनन्या पांडेच्या (Ananya Panday) एका कार्यक्रमातील रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अनन्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Ananya Panday: बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या प्रोफेशनल लाईफशी संबंधित इतर काही गोष्टींमुळे चर्चेत असतात. हे कलाकार अनेकदा विविध कार्यक्रमांमध्ये रॅम्प वॉक करतात. त्यांच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अशताच आता अभिनेत्री अनन्या पांडेच्या (Ananya Panday) एका कार्यक्रमातील रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अनन्याच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
अनन्याच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ व्हायरल
अनन्या पांडेने पॅरिस कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. यावेळी अनन्यानं प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रासाठी वॉक केले. तिच्या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये अनन्याही ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स अन् हातात भली मोठी जाळी अशा लूकमध्ये रॅम्प वॉक कपताना दिसत आहे.
नेटकऱ्यांनी अनन्याला केलं ट्रोल
पॅरिसमधील कार्यक्रमासाठी अनन्यानं केलेल्या लूकची अनेक नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनन्याच्या रॅम्प वॉकच्या व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, "ही जाळी घेऊन चालताना अनन्या खूप स्ट्रगल करत आहे." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "दीदी, हा कार्यक्रम झाल्यानंतर माझी मच्छरदाणी परत कर."
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
अनन्यानं नुकतेच तिचे पॅरिसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अनन्या पिझ्झा आणि पास्तावर ताव मारताना दिसत आहे. या फोटोंना अनन्यानं कॅप्शन दिलं, "Paris for a quick minute"
आदित्यसोबत जोडलं जातंय अनन्याचं नाव
गेल्या दिवसांपासून अनन्या ही तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. अनन्याचं नाव आदित्य रॉय कपूरसोबत अनेकवेळा जोडलं जातं. अनन्या आणि आदित्य यांना अनेक वेळा एकत्र स्पॉट करण्यात येतं.
काही दिवसांपूर्वी अनन्याचा "खो गए हम कहां" हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं.सिद्धांत चतुर्वेदी, आदर्श गौरव यांनी देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: