एक्स्प्लोर
अमिताभला भेटण्यासाठी चाहत्याची अजब करामत
![अमिताभला भेटण्यासाठी चाहत्याची अजब करामत Amitabh Bachchans Fan Breaks Into His Jalsa House Arrested अमिताभला भेटण्यासाठी चाहत्याची अजब करामत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/03/18131203/amitabh-compressed-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चनच्या एका चाहत्याने मुंबईच्या जुहू परिसरातील 'जलसा' बंगल्याची भिंत ओलांडून आत शिरला. यानंतर बंगल्यातील पोलिसांनी त्याला अटक करून त्याची कारगृहात रवानगी केली. या चाहत्याने अतिउत्साहात अमिताभसमोर आपले कला-गुण दाखवण्यासाठी हे धाडस केले.
मुंबई पोलीसमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय बनवारी यादव याने अमिताभच्या 'जलसा' या बंगल्याची भित रविवारी दुपारी ओलांडून घरात शिरण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला अटक करण्यात आली. यादव स्वत: ला अमिताभचा चाहता आणि गायक सांगत आहे.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाला अमिताभसमोर आपले कौशल्य दाखवण्याची इच्छा होती. त्यामुळे तो जेव्हा भिंतीवरून घरात घुसण्याच्या प्रयत्नात होता, त्यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले.
या घटनेची पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरु आहे. दरम्यान या प्रकरणी यादवला स्थानिक सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)