एक्स्प्लोर
'दीवार' सिनेमाला 42 वर्षे पूर्ण, अमिताभ बच्चन काय म्हणाले?
मुंबई: गुन्हेगारी जगातावर चित्रित झालेला 1975 मधील 'दीवार' सिनेमाला आज 42 वर्षे झाली. यानिमित्त अमिताभ बच्चन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिग्दर्शक यश चोप्रा यांची या सिनेमाची कथा सर्वोत्तम असल्याचं म्हणलं आहे.
'दीवार' सिनेमानंतर अमिताभ बच्चन यांची बॉलिवूडमध्ये 'अँग्री यंग मॅन' म्हणून ओळख निर्माण झाली. आज सिनेमाला 42 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमिताभ बच्चन यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या सिनेमात मुंबईतील गल्ल्यांमधील जीवन चित्रित केले असून, सिनेमाची कथा दोन भावांच्या संघर्षावर आधारलेली होती. हे दोघेही भाऊ आपल्या भूतकाळामुळे वेगवेगळ्या मार्गावर चालले होते. या सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत शशी कपूर, परवीन बॉबी, नीतू सिंह आणि निरुपा रॉय प्रमुख भूमिकेत होते.T 2512 - 42 YEARS of 'DEEWAR' .. the best screenplay ever !! And 100 weeks trophy, compared to the weeks of today's films .. Times change pic.twitter.com/UfNqltO69W
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 23, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
रायगड
जळगाव
व्यापार-उद्योग
Advertisement